Whatsapp Image Scam OTP Bank Fraud  esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Image Scam : व्हॉट्सअ‍ॅपवर एक फोटो येताच बँक खातं झालं रिकामं, प्रकरण गंभीर, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Whatsapp Image Scam OTP Bank Fraud : व्हॉट्सअ‍ॅपवरील नवीन इमेज स्कॅममुळे अनेक लोकांचे बँक खाते रिकामे होण्याचा धोका वाढला आहे. हा सायबर फ्रॉड नेमका काय आहे जाणून घ्या

Saisimran Ghashi

Whatsapp Image Fraud : जबलपूरमधील एका व्यक्तीला WhatsApp वरून अनोळखी नंबरवरून पाठवलेल्या एकाच इमेजमुळे सुमारे 2 लाख रुपये गमवावे लागले. सायबर गुन्हेगारीच्या या नवीन पद्धतीला 'स्टीगॅनोग्राफी' म्हणतात आणि यामुळे अनेक लोकांचे पैसे बँक खात्यातून चोरीला जात आहेत. या घोटाळ्याबाबत माहिती घेणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही पद्धत पारंपारिक OTP, फेक लिंक किंवा डिजिटल अरेस्ट यांच्या तुलनेत अधिक धोका निर्माण करणारी आहे.

स्टीगॅनोग्राफी फ्रॉड

साईबर गुन्हेगार WhatsApp किंवा अन्य मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर फोटो पाठवून त्याची सुरुवात करतात. अनेक वेळा, त्या इमेजसाठी त्यांनी फोन कॉल करून पीडिताला विचारलेलं असू शकतं. पीडित व्यक्तीला इमेज डाउनलोड करण्यासाठी प्रेरित केलं जातं. जेव्हा पीडित व्यक्ती इमेज डाउनलोड करते, तेव्हा त्यांचा फोन क्रॅश होतो आणि त्या क्षणापासून हॅकर त्यांच्या फोनला हॅक करतो.

सायबर तज्ञांनी सांगितलं की, सायबर गुन्हेगार आता पारंपारिक OTP आणि फेक लिंकच्या तंत्रावरून एक अधिक प्रगत पद्धत वापरत आहेत, ज्यात इमेजेसमध्ये असलेल्या लिंकचा वापर केला जातो. या तंत्राला 'स्टीगॅनोग्राफी' म्हटलं जातं.

स्टीगॅनोग्राफी म्हणजे काय?

कॅस्परस्कीच्या माहितीनुसार, स्टीगॅनोग्राफी म्हणजे दुसऱ्या मेसेज किंवा कंटेंटमध्ये माहिती लपवणं, ज्यामुळे ती माहिती ओळखली जाऊ नये. यात पाठवलेल्या इमेजमध्ये डिजिटल कंटेंट , जसं की टेक्स्ट, इमेज, व्हिडीओ किंवा ऑडिओ लपवता येऊ शकते.

सायबर गुन्हेगार आता या तंत्राचा वापर करून हानिकारक लिंक इमेजमध्ये लपवतात. या लिंकद्वारे पीडिताच्या स्मार्टफोनवर मालवेअर डाउनलोड होतो, जो OTP मिळवण्यास सक्षम करतो आणि त्यामुळे अनधिकृत पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले जातात.

सुरक्षेसाठी काय करावे आणि काय टाळावे?

  • कोणत्याही अनोळखी नंबरवरून पाठवलेली फोटो, व्हिडीओ किंवा व्हॉईस नोट डाउनलोड करू नका.

  • इमेज किंवा व्हिडीओचा आकार (mb) मोठा दिसल्यास, त्याला डाउनलोड करण्यापासून दूर रायहा, कारण ते हानिकारक अॅप्लिकेशन्सच्या लिंकसाठी वापरले जाऊ शकतात.

  • आपल्या WhatsApp नंबरला बँक खात्याशी लिंक करू नका.

  • अशा प्रकारच्या घटना झाल्यास सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवा किंवा सायबर क्राइम हेल्पलाइनवर 1930 वर कॉल करा.

सायबर सुरक्षा जागरूकतेची गरज

आजकाल सायबर गुन्हेगार नवनव्या आणि अधिक प्रगत पद्धती वापरत आहेत. त्यामुळे, प्रत्येकाने अधिक जागरूक राहून आपले स्मार्टफोन आणि बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात धोके खूप वाढले आहेत आणि त्याला तोंड देण्यासाठी आपल्याला सतर्क आणि सजग राहणं खूप आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT