whatsapp Instagram 
विज्ञान-तंत्र

WhatsApp सह इन्स्टाग्राम डाऊन; फेसबुक, ट्विटरवर ट्रेंड

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम सुरु होत नाही म्हणून गेल्या तासाभरात तुम्हीती तुमचा फोन रिस्टार्ट केलात का? इंटरनेट, वायफाय ऑन ऑफ करून पाहिलं असेल तर त्यात काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही अॅप काही काळ डाऊन झाल्याचं आता समोर आलं आहे. सोशल मीडिया मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास काही काळ बंद बंद पडले होते. मेसेज सेंड आणि रिसिव्ह होण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर ट्विटरसह फेसबूकवरून लोकांनी व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम वापरण्यास अडचण येत असल्याचं सांगत मीम्स शेअर केले आहेत. वेब व्हॉटसअॅपसुद्धा कनेक्ट करण्यात प्रॉब्लेम येत होते. याबाबत अद्याप व्हॉटसअॅप किंवा इन्स्टाग्रामकडून अधिकृतपणे काय झालं होतं याची माहिती देण्यात आलेली नाही. 

WABetaInfo ने याबाबत माहिती देताना सांगितलं की, इन्स्टा आणि व्हॉटसअॅप वापरण्यामध्ये अडचणी येत असून डाऊन झाले आहे. 

इन्स्टाग्राम युजर्सना त्यांचे फीड लेटेस्ट अपडेट दिसत नव्हते. पोस्ट करण्यातही अडचणी येत होत्या. ट्विटरवर व्हाटसअॅप डाऊन असा ट्रेंडही सुरु झाला. 

अनेक युजर्सनी मेसेज सेंड रिसिव्ह होत नसल्यानं त्यांचेे फोनही रिस्टार्ट केले. तसंच इंटरनेट ऑन ऑफ करूनही पाहिले. एका युजरनं ट्विटरवर म्हटलं की, व्हॉटसअॅप डाऊन झालं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा फोन किंवा वायफाय रिस्टार्ट करण्याची गरज नाही. 

व्हॉटसअॅप इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर युजर्सनी ट्विटरवर धाव घेतली. ट्विटरवर व्हॉटसअॅप इन्स्टाग्राम डाऊन झाल्याचं ट्रेंडमध्ये दिसल्यानंतर मीम्स शेअर करण्यास सुरुवात झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT