whatsapp custom lists Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Custom Lists : कोट्यवधी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मिळाले आणखी एक खास फीचर,आता शोधावे लागणार नाहीत बाबू-शोनाचे चॅट्स

whatsapp custom lists Feature launch : जगभरात दोन अब्जांहून अधिक युजर्स असलेल्या व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी नवीन 'कस्टम लिस्ट्स' फिचर लॉंच केले आहे.

Saisimran Ghashi

Whatsapp custom lists Feature : जगभरात दोन अब्जांहून अधिक युजर्स असलेल्या व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी नवीन 'कस्टम लिस्ट्स' फिचर लॉंच केले आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली असून, या फिचरमुळे युजर्सना त्यांच्या चॅट्सचे मॅनेजमेंट अधिक सुलभ होणार आहे. कस्टम लिस्ट्समुळे वापरकर्त्यांना कुटुंब, मित्र, कामाच्या सहका-यांचा गट तयार करून संपर्क सोपे होणार आहे.

कस्टम लिस्ट्सची वैशिष्ट्ये

नवीन कस्टम लिस्ट्स फिचरच्या मदतीने युजर्स त्यांचे आवडते संपर्क आणि ग्रुप वेगवेगळ्या लिस्ट्समध्ये वर्गीकृत करू शकतात. जसे की, कुटुंब, मित्र, ऑफिसच्या सहका-यांचे वेगळे गट तयार करून त्यात आवश्यक संपर्क जोडता येतील. यामुळे वैयक्तिक तसेच व्यावसायिक वापरासाठी चॅट व्यवस्थापन सोपे होईल.

कस्टम लिस्ट्स कशी तयार कराल?

1. सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा.

2. चॅट्स टॅबवर जा आणि फिल्टर बारवरील '+' चिन्हावर टॅप करा.

3. कस्टम लिस्ट तयार करा, त्याला नाव द्या आणि आवश्यक संपर्क व ग्रुप्स जोडा.

हे गट चॅट्स टॅबमध्ये वर दिसणार असल्याने युजर्सना चॅट शोधण्यासाठी स्क्रोल करण्याची गरज पडणार नाही.

या नवीन फिचरमुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना महत्वाच्या चॅट्सवर पटकन जाता येईल. विशेषतः व्यवसायिक वापरकर्त्यांसाठी हे फिचर अत्यंत उपयोगी ठरणार आहे, कारण एका टॅपवर त्यांना आवश्यक गट शोधणे सहज शक्य होईल. कंपनी नेहमीच वापरकर्त्यांसाठी खास फीचर्स आणत असते. आता हे फीचर्स देखील वापरकर्त्यांना आवडेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT