Whatsapp document scanning feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲपमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; युजर्ससाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Whatsapp document scanning feature : व्हॉट्सॲपने नवीन डॉक्युमेंट स्कॅनिंग फीचर लॉन्च केले आहे, ज्यामुळे वापरकर्ते थर्ड-पार्टी अ‍ॅप्सशिवाय डॉक्युमेंट्स स्कॅन आणि शेअर करू शकतात. हा फीचर सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

Saisimran Ghashi

Whatsapp Doc Scanner : जगभरात दोन अब्जांहून अधिक युजर्स असलेल्या लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने युजर्सचा अनुभव अधिक उत्तम करण्यासाठी सतत नवनवीन फिचर्स सादर केले आहेत. आता 2025 च्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने एक अत्यंत उपयुक्त डॉक्युमेंट स्कॅनिंग फिचर लाँच केले आहे. यामुळे युजर्सना थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करण्याची गरज भासणार नाही.

डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि शेअरिंगसाठी वेगळ्या ॲप्सची गरज नाही. व्हॉट्सॲपच्या या नव्या फिचरमुळे युजर्स ॲपमधील कॅमेरा वापरून थेट डॉक्युमेंट स्कॅन करू शकतात आणि कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू शकतात. यामुळे वेळ आणि श्रम वाचतील आणि युजर्सना इतर ॲप्सवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही.

फिचरचा वापर कसा कराल?

1. आपल्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.

2. स्क्रीनच्या खालील बाजूला असलेल्या 'प्लस' चिन्हावर टॅप करा आणि 'Document' पर्याय निवडा.

3. तीन पर्याय दिसतील: 'Choose from files,' 'Choose photo or video,' आणि 'Scan document.' त्यापैकी 'Scan document' पर्याय निवडा.

4. आपल्या कॅमेऱ्याचा वापर करून डॉक्युमेंट स्कॅन करा आणि शेअर करा.

सध्या आयफोन युजर्ससाठी उपलब्ध, लवकरच Android युजर्ससाठीही लाँच होणार आहे. व्हॉट्सॲपचा हा नवीन फिचर सध्या iPhone युजर्ससाठी उपलब्ध असून, Android युजर्ससाठीही हे फिचर लवकरच सादर केले जाणार आहे. मात्र, अद्याप त्यासाठी निश्चित तारीख जाहीर झालेली नाही.

डिजिटल युगातील नवा टप्पा

व्हॉट्सॲपच्या या नवीन अपडेटमुळे युजर्सचा वेळ आणि संसाधने वाचणार आहेत. ऑफिस दस्तावेज, ओळखपत्रे किंवा शैक्षणिक कागदपत्रांसारख्या गोष्टी स्कॅन आणि शेअर करणे यामुळे अतिशय सोपे होईल.

व्हॉट्सॲपचा हा उपक्रम डिजिटल संवाद अधिक सुकर करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. त्यामुळे व्हॉट्सॲप युजर्ससाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT