WhatsApp Text Formatting eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Text Formatting : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सना दिली खास भेट! एकाच वेळी लाँच केले चार-चार फीचर्स

WhatsApp New Features : हे फीचर्स सामान्य चॅटमध्ये, चॅनल्समध्ये आणि ग्रुपमध्ये देखील वापरता येणार आहेत. यामध्ये बुलेट्स, नंबरिंग, ब्लॉक आणि इनलाईन या चार फीचर्सचा समावेश आहे.

Sudesh

WhatsApp New Text Formatting Features : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सना मोठं गिफ्ट दिलं आहे. या अ‍ॅपवर चॅटिंग करण्यासाठी एकाच वेळी चार-चार फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. यामुळे यूजर्स आता टेक्स्ट लिहिताना त्यात विविध प्रकारचे फॉरमॅट्स वापरू शकणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अँड्रॉईड, वेब, मॅक आणि iOS व्हर्जनसाठी हे टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल फीचर लाँच केलं आहे. हे फीचर्स सामान्य चॅटमध्ये, चॅनल्समध्ये आणि ग्रुपमध्ये देखील वापरता येणार आहेत. यामध्ये बुलेट्स, नंबरिंग, ब्लॉक आणि इनलाईन या चार फीचर्सचा समावेश आहे.

बुलेट्स

लिहिताना एखादी यादी बनवायची असेल, तर आपण बुलेट्सचा वापर करतो. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तुम्ही एका-खाली-एक पॉइंट्स लिहित जरी गेला, तरी प्रत्येक ओळीला वेगळी बुलेट द्यावी लागत होती. आता मात्र हे आपोआप होणार आहे. तुम्ही लिहित असताना केवळ एंटर दाबल्यानंतर खालच्या ओळीला ऑटोमेटिकली बुलेट दिसेल. यासाठी तुम्हाला पहिल्या वाक्यात बुलेट जोडल्यानंतर त्याच्या पुढे अन् मागे '_' (अंडरस्क्रोल) हे चिन्ह लावावं लागेल.

नंबरिंग

बुलेट्स प्रमाणेच यादी बनवताना जर तुम्हाला अंक लिहायचे असतील, तर त्यासाठी देखील नवीन फीचर देण्यात आलं आहे. यासाठी तुम्हाला केवळ पहिल्या पॉइंट पूर्वी 1 हा अंक लिहावा लागणार आहे. त्यानंतर एंटर दाबल्यास खालच्या ओळीला आपोआप 2, 3, 4 असे पुढचे अंक येत जातील.

इतर फीचर्स

याव्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपने आणखीही काही टेस्क्ट फॉरमॅटिंग शॉर्टकट्स जारी केले आहेत. यामध्ये टेक्स्ट बोल्ड करणे, हायलाईट करणे, इटॅलिक करणे, शब्दांवर रेष ओढणे (स्ट्राईकथ्रू), मोनोस्पेस आणि इनलाईन कोड अशा फीचर्सचा समावेश आहे. विविध प्रकारच्या चिन्हांचा वापर करून तुम्ही हे फीचर्स वापरू शकणार आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT