Whatsapp Video Call Camera Privacy Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एक गेमचेंजर फीचरची एंट्री; नव्या अपडेटमध्ये स्पेशल काय? वाचा एका क्लिकवर

Whatsapp Video Call Camera Privacy Feature : व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन प्रायव्हसी फीचर विकसित केले आहे ज्यामुळे यूझर्सना व्हिडिओ कॉल उचलण्यापूर्वीच कॅमेरा बंद करण्याची सुविधा मिळेल. यामुळे वापरकर्त्यांचा गोपनीयता आणि सुरक्षा वाढेल.

Saisimran Ghashi

Whatsapp Video Call Camera Feature : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक महत्त्वाचे अपडेट आणणार आहे, जो युजर्सना व्हिडिओ कॉल उचलण्याआधीच त्यांचा कॅमेरा बंद करण्याची सुविधा देईल. या नव्या फीचरमुळे गोपनीयता अधिक सुरक्षित होईल आणि युजर्सना अनपेक्षित व्हिडिओ कॉल्समुळे होणाऱ्या गैरसोयीपासून बचाव करता येईल.

व्हिडिओ कॉल्ससाठी ‘प्रायव्हसी फोकस्ड’ सुविधा

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल आला की फ्रंट कॅमेरा आपोआप सुरू होतो. त्यामुळे कॉल उचलण्यापूर्वीच युजर स्क्रीनवर दिसतो. जर कॅमेरा बंद करायचा असेल तर तो कॉल उचलल्यानंतर मॅन्युअली बंद करावा लागतो. मात्र लवकरच येणाऱ्या नव्या अपडेटमध्ये युजर्सना कॉल उचलण्याआधीच "Turn off your video" पर्याय मिळेल. त्यामुळे युजर व्हॉइस-ओनली मोडमध्ये कॉल उचलू शकतो.

व्हिडिओ कॉल स्कॅम्सवर प्रभावी उपाय

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर काही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, जसे की सेक्सटॉर्शन किंवा मॉडिफाइड व्हिडिओ कॉल्सद्वारे युजर्सची फसवणूक केली जाते. अशा परिस्थितीत हे नवे फीचर अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे युजर्सना व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर लगेच कॅमेऱ्यासमोर यावे लागणार नाही.

कधी येणार अपडेट?

हे फीचर अजूनतरी सर्वांसाठी उपलब्ध नाही पण WhatsApp च्या 2.25.7.3 बीटा व्हर्जनमध्ये याची चाचणी सुरू आहे. लवकरच ते सर्व युजर्ससाठी रोलआउट केले जाईल. हे खूप फायद्याचे ठरेल.

हा बदल WhatsApp साठी गेमचेंजर ठरू शकतो. यामुळे युजर्सला अधिक नियंत्रण मिळेल आणि प्रायव्हसीची अधिक खात्री दिली जाईल. जर तुम्ही व्हिडिओ कॉल्स उचलण्यास संकोच करत असाल किंवा अनपेक्षित कॉल्स टाळू इच्छित असाल तर ही सुविधा नक्कीच फायदेशीर ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: ''...म्हणून वाल्मिक कराडला जामीन नको'', उज्ज्वल निकम यांचा जोरदार युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : माटुंगामध्ये विद्यार्थी बचावकार्याला सुरुवात

Flood Rescue: पुरात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात अपयश; सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू होणार मोहीम

CPL 2025 : शाहरुखच्या संघातील फलंदाजाचे २० चेंडूंत ९२ धावांसह वादळी शतक; मोडला निकोलस पूरचा रेकॉर्ड

Nashik Ganeshotsav : बाप्पाच्या आरासीला 'चमकी'चा साज; गणेशोत्सवासाठी आकर्षक कापडांना नाशिकमध्ये मोठी मागणी

SCROLL FOR NEXT