WhatsApp Voice Chat eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Voice Chat : तुम्हालाही दिसलं का व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये नवीन चिन्हं? व्हॉइस कॉलसाठी लाँच केलंय खास फीचर!

WhatsApp New Feature : यामुळे ग्रुपमधील सदस्यांना डिस्टर्ब न करता एकत्रित व्हॉईस कॉल करणं शक्य होणार आहे.

Sudesh

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. मोठ्या ग्रुप्समध्ये व्हॉईस कॉल करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. 'सायलेंट ग्रुप व्हॉईस कॉल' असं या फीचरचं नाव आहे. यामुळे ग्रुपमधील सदस्यांना डिस्टर्ब न करता एकत्रित व्हॉईस कॉल करणं शक्य होणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 33 पेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या ग्रुप्समध्ये हे फीचर मिळणार आहे. त्यामुळेच तुम्हाला कदाचित काही ग्रुप्समध्येच या फीचरचा आयकॉन दिसत असावा.

कसं काम करतं फीचर?

ग्रुपच्या वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या नव्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सर्व मेंबर्सना कॉल जाणार आहे. मात्र साध्या कॉलप्रमाणे याची रिंग त्यांना जाणार नाही. केवळ त्यांच्या स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. ज्यावर क्लिक करुन ते कॉल जॉईन किंवा कट करू शकतील. यामुळे ज्यांना कॉलमध्ये सहभागी व्हायचं नाही त्यांना डिस्टर्ब देखील होणार नाही. (Tech News)

एका अ‍ॅपमध्ये दोन अकाउंट

व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक खास फीचर उपलब्ध करून दिलं आहे. एकाच अ‍ॅपमध्ये दोन वेगवेगळे अकाउंट वापरण्यासाठी कंपनीने मल्टी अकाउंट फीचर लाँच केलं आहे. प्रोफाईल सेक्शनमध्ये गेल्यावर क्यूआर-कोड शेजारी तुम्हाला डाऊन अ‍ॅरो असणारा एक सिम्बॉल दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं अकाउंट अ‍ॅड करण्याचा पर्याय दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT