WhatsApp VC New Feature Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp VC Feature : व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हॉट्सॲपने आणलं नवं फीचर; कसं सुरू कराल लो-लाइट मोड? काय आहे फायदा,जाणून घ्या

WhatsApp VC New Feature launch : WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन अपडेट आणले आहे, ज्यामुळे आता कमी प्रकाशात व्हिडिओ कॉल करताना चांगला अनुभव मिळणार आहे.

Saisimran Ghashi

WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन अपडेट आणले आहे, ज्यामुळे आता कमी प्रकाशात व्हिडिओ कॉल करताना चांगला अनुभव मिळणार आहे. या अपडेटमध्ये आलेल्या लो-लाइट मोडमुळे कमी प्रकाशात देखील चेहरा स्पष्ट दिसेल आणि व्हिडिओ कॉलच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल. हा मोड विशेषत: अशा परिस्थितीत उपयुक्त ठरेल, जेव्हा आपण अंधुक किंवा अपुऱ्या प्रकाशात असाल.

काय आहे WhatsApp लो-लाइट मोड?

लो-लाइट मोडचा उद्देश म्हणजे कमी प्रकाशात देखील व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव चांगला बनवणे. या मोडचा वापर केल्यास व्हिडिओ कॉल दरम्यान चेहरा अधिक स्पष्ट आणि प्रकाशमान दिसतो, ज्यामुळे काळोखात होणारी ग्रेनीनेस किंवा धूसरता कमी होते. यामुळे आपले नातेवाईक आणि मित्र तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये चांगले पाहू शकतील, अगदी कमी प्रकाशात देखील.

लो-लाइट मोड कसा अ‍ॅक्टिवेट करायचा?

हा मोड वापरणे अतिशय सोपे आहे. खालील पद्धतीने आपण लो-लाइट मोड अ‍ॅक्टिवेट करू शकता.

1. WhatsApp उघडा.

2. व्हिडिओ कॉल सुरू करा.

3. आपला व्हिडिओ स्क्रीनवर फुलस्क्रीन करा.

4. उजव्या वरच्या कोपऱ्यातील 'बल्ब' आयकॉनवर टॅप करून लो-लाइट मोड सुरू करा.

5. मोड बंद करण्यासाठी परत बल्ब आयकॉनवर टॅप करा.

  • हा मोड iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

  • सध्या Windows WhatsApp अ‍ॅपवर हा फीचर उपलब्ध नाही, मात्र आपण brightness मॅन्युअली सेट करू शकता.

  • प्रत्येक कॉलसाठी हा मोड स्वतंत्रपणे सुरू करावा लागेल, तो कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नाही.

WhatsApp च्या या नवीन लो-लाइट मोडमुळे कमी प्रकाशात देखील आपल्या प्रियजनांशी चांगल्या प्रकारे संवाद साधने सोपे झाले आहे. त्यामुळे पुढच्या वेळी अंधुक प्रकाशात असाल, तर या मोडचा वापर करून अधिक स्पष्ट आणि व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT