WhatsApp's Metro Ticketing Service Now in Nagpur esakal
विज्ञान-तंत्र

Metro Ticket Booking : व्हॉट्सॲप वापरून बुक करता येणार मेट्रो तिकीट; या शहरात सुरू झालीये सुविधा; जाणून घ्या

Ticket Booking Via Whatsapp : सिंगल जर्नी ते 40 प्रवाशांपर्यंत ग्रुप तिकीट बुक करण्याची सुविधा,AI चॅटबॉट तुमच्या मदतीला

Saisimran Ghashi

Nagpur : नागपूरच्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता नागपूरकर तुमच्या मोबाईलवरून व्हॉट्सअँपवरुनच तुमच्या मेट्रोची तिकीट बुक करू शकणार आहेत. लोकप्रियता वाढलेल्या व्हॉट्सअँपचा वापर आता नागपूरच्या मेट्रोने केला असून त्यांनी AI चॅटबॉटवर आधारित तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. या सोईस्कर सेवेमुळे प्रवासी आता त्यांच्या प्रवासासाठी अगोदर तिकीट बुक करू शकतात.

ही सुविधा हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तेलगू या चार भाषांमध्ये उपलब्ध आहे. याचा फायदा घेण्यासाठी फक्त +91 8624888568 या क्रमांकावर ‘Hi’ पाठवा किंवा दिलेला QR कोड स्कॅन करा. या सोप्या चॅटबॉटवर तुम्ही तुमची तिकीट बुक करू शकता, रिअल-टाइम माहिती मिळवू शकता आणि थेट व्हॉट्सअँपवरून प्रवासाविषयी आवश्यक माहिती मिळवू शकता.

नियमित प्रवाशांसाठी या सेवेमध्ये एक खास ‘क्विक पर्चेस’चा पर्याय आहे. या पर्यायामुळे तुम्ही तुमची नेहमीची रूट्स सेव्ह करू शकतात आणि तिकीट बुकिंग करताना वेळ वाचवू शकता. ही सोईस्कर सेवा तुम्हाला एका वेळी 6 सिंगल जर्नी तिकीट किंवा 40 प्रवाशांपर्यंतच्या ग्रुप तिकीट बुक करण्याची सुविधा देते.

त्यासोबतच तुमच्या आवडीच्या पेमेंट गेटवे UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे थेट व्हॉट्सअँपवरून पेमेंट करू शकता.

ज्युरनच्या सार्वजनिक परिवहनात गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअँपचा वापर वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि वापरण्यास सुलभ असा अनुभव मिळतो. नागपूर मेट्रोमध्ये ही सेवा सुरू झाल्याने सार्वजनिक परिवहनाचे आधुनिकीकरण होणार असून आता दैनिक प्रवाशांना त्यांच्या प्रवासात अधिक सोय होणार आहे.

“नागपूर मेट्रोमध्ये व्हॉट्सअँपद्वारे QR तिकीट सेवा सुरू झाल्याने लाखो प्रवाशांना अधिक परिष्कृत आणि बुद्धिमान प्रवास अनुभव मिळणार आहे.” असे मेटा इंडियामधील बिझनेस मेसेजिंगचे डायरेक्टर रवि गर्ग यांनी सांगितले. तसेच, “या सहकार्यामुळे आम्ही देशभरातील प्रवाशांसाठी परिवहनाचा अनुभव सोपा करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. आता ते व्हॉट्सअँप चॅटमध्येच त्यांची कामे पूर्ण करू शकतात,असे ते म्हणाले.”

देशातील अधिकाधिक शहरे सार्वजनिक परिवहनासाठी डिजिटल पर्यायांचा अवलंब करत असून स्मार्ट, कार्यक्षम आणि प्रवासीकेंद्री परिवहन प्रणालीकडे वाटचाल आहेत. त्यामुळे भारतातील शहरी परिवहनाची नवी मानके तयार होण्याची दिशा उघडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT