New WhatsApp Feature: Link One Account to Up to Four Device esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Multi Login : व्हॉट्सअपचा आलाय 'मल्टि लॉगिन' ऑप्शन, कोणत्या डिव्हाइसवर चालू करता येईल?

Whatsapp News : या डिव्हाइसेस वर करता येणार व्हाट्सअप लॉगिन

सकाळ डिजिटल टीम

Whatsapp Update : व्हाट्सअपने नुकतीच एक धमाकेदार घोषणा केली आहे. आता तुम्ही तुमचे व्हाट्सअप अकाऊंट एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरू शकता. त्यामुळे तुमचा फोन बंद असला तरी तुमचा डेटा आणि तुमच्या चॅट सुरक्षित राहतील.

कोणत्या डिव्हाइसवर व्हाट्सअप चालू करता येईल?

  • डेस्कटॉप

  • स्मार्टवॉच

  • व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट

  • टॅब्लेट

अनेक डिव्हाइसवर एकाच वेळी व्हाट्सअप वापरण्यासाठी सोप्या पद्धती जाणून घेऊया.

Android वापरणारे यूजर्स:

तुमच्या मुख्य फोनवर व्हाट्सअप उघडा आणि सेटिंग्जमध्ये जा.

"लिंक्ड डिवाइसेस" वर टॅप करा आणि "लिंक डिवाइस" निवडा.

तुम्हाला लिंक करायचा असलेला डिव्हाइस तुमच्या मुख्य फोनच्या समोर ठेवा आणि दाखवलेला QR कोड स्कॅन करा.

iPhone वापरणारे यूजर्स:

Android वापरणार्‍यांसाठी दिलेल्या सूचनेप्रमाणेच "लिंक अ डिवाइस" वर जा.

तुमचा iPhone लिंक करायचा असलेल्या डिव्हाइसच्या समोर ठेवा आणि QR कोड स्कॅन करा. ही प्रोसेस एवढी सोपी आहे.

डेस्कटॉप WhatsApp:

  • तुमच्या मुख्य फोनवर (Android किंवा iOS) व्हाट्सअप उघडा.

  • सेटिंग्जमध्ये जा आणि "लिंक्ड डिवाइसेस" निवडा.

  • तुमच्या डेस्कटॉपवर, ब्राउझरवर WhatsApp वेब पेज (www.whatsapp.com) उघडा.

  • एक नवीन विंडो QR कोडसह उघडेल. तो कोड तुमच्या मुख्य फोनने स्कॅन करा.

  • डिव्हाइस सिंक होण्याची वाट पहा. तुमच्या चॅट डेस्कटॉपवर दिसतील.

WearOS स्मार्टवॉचसाठी व्हाट्सअप:

  • तुमच्या Wear OS स्मार्टवॉचवर व्हाट्सअप उघडा.

  • स्क्रीनवर आठ-अंकी कोड दिसेल.

  • सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जाण्यासाठी क्लिक करा.

  • तुमचे मुख्य व्हाट्सअप डिव्हाइस घ्या आणि स्मार्टवॉचवर दिसलेला आठ-अंकी कोड एंटर करा.

  • Apple वॉचसाठी व्हाट्सअप:

  • सध्या Apple वॉचवर फक्त व्हाट्सअप नोटिफिकेशन वाचता येतात, मेसेजला उत्तर देता येतात आणि मेसेज पाठवता येतात / प्राप्त करता येतात.

VR हेडसेटसाठी व्हाट्सअप:

  • हेडसेटवर व्हाट्सअप डाउनलोड करा.

  • सर्व सूचनांचे पालन करा आणि पुढे जाण्यासाठी क्लिक करा.

  • हेडसेटवर आठ-अंकी कोड दिसेल.

  • तुमच्या मुख्य डिव्हाइसवर व्हाट्सअप उघडा आणि सेटिंग्ज > लिंक्ड डिवाइसवर क्लिक करा.

  • "लिंक विथ फोन नंबर" निवडा.

  • अंकी कोड टाका आणि व्हाट्सअप लॉगिन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT