Whats App Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whats App Feature : व्हॉट्सॲपमधील अवतार स्टिकर्स आता युझर्सला कंट्रोल करता येणार, 'या' नवीन फीचरमध्ये काय असणार खास?

Whats App Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन फीचर्सची सतत भर पडत असते. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर पहायला मिळणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Whats App Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन फीचर्सची सतत भर पडत असते. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर पहायला मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते स्टिकर्समध्ये त्यांच्या अवतारचा वापर स्टिकर म्हणून कोण करू शकणार?  हे निवडू शकणार आहेत.

या नव्या फिचरमध्ये युझरला माय कॉन्टॅक्ट्स, सिलेक्टेड कॉनटॅक्ट्स आणि नोबडी असे ३ पर्याय निवडण्याची सुविधा मिळणार आहे. जर युझर्स आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स दोघांनी जर हे फिचर अ‍ॅक्टिव्हेट केले तर या दोघांच्या अवतारातील स्टिकर्स त्यांना चॅटमध्ये पहायला मिळतील.

नव्या फीचरमध्ये काय असणार?

WABetaInfo या पोर्टलच्या एका रिपोर्टनुसार, हे नवे अवतार फीचर लवकरच येऊ शकते. ज्यामध्ये युझर्स त्यांच्या अवतार स्टिकर्सचा वापर कोण करू शकते? हे ठरवू शकणार आहे. तसेच, हे फीचर नियंत्रित करू शकतील. यासोबतच युझर्सचे अवतार स्टिकर्स हे त्याच लोकांपुरते मर्यादित असतील, ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे.

विशेष म्हणजे बीटा टेस्टर्स या फीचरचे अपडेट व्हर्जन २.२४.६.८ वर वापरू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फीचर वापरण्यास सोपे आणि मजेशीर असण्याची शक्यता आहे. या अनोख्या फीचरमुळे चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता कमी होईल आणि गोपनियता देखील राखली जाईल.

त्यामुळे, हे नवे फीचर तरूणाईच्या पसंतीस पडेल यात काही शंका नाही. यापूर्वी युझर्सकडून बनवण्यात आलेल्या स्टिकर्सवर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नव्हते. मात्र, या नव्या फीचरमुळे नियंत्रण ही राखले जाईल आणि गोपनियताही पाळली जाईल.

हे फीचर कधी लॉंच होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच हे फीचर लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वीच्या एका रिपोर्टमध्ये व्हॉट्सॲपच्या स्टिकर एडिटर फीचरचाही उल्लेख करण्यात आला होता. ज्यामध्ये युझर्स कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय स्टिकर्स एडिट करू शकतात. व्हॉट्सॲपचे हे फीचर iOS च्या 24.1.10.72 मध्ये देण्यात आले आहे. आता या नव्या फीचरमुळे अवतार स्टिकर्स वापरण्याचा युझर्सचा अनुभव हा आणखी मजेशीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT