WhatsApp google
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Feature : मित्रांचा मोठा ग्रुपच करु शकणार व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग; काय आहे नवीन फिचर?

संतोष कानडे

नवी दिल्लीः 'व्हॉट्सअ‍ॅप'ने एक नवीन फिचर सादर केलं आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन फिचरमुळे ग्रुप कॉलिंगचा अनुभव आणखी मजेदार होईल. एकाचवेळी तब्बल ३१ युजर्सचा ग्रुप कॉलिंगमध्ये समावेश होऊ शकतो.

WABteaINFO च्या रिपोर्टनुसार WhatsApp कॉल टॅबमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यातूनच ३१ युजर्सना एकाच वेळी कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने याचे अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केलेले आहे. ते २.२३.१९.१६ व्हर्जनमध्ये अॅक्सेस केले जावू शकते.

यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर जास्तीत जास्त १५ लोकांसोबत ग्रुप कॉल करता येऊ शकत होता. त्यापूर्वी केवळ सात लोकांना एकाचवेळी कॉलिंगची सुविधा होती. आता मात्र ३१ जण एकाचवेळी व्हॉट्सअ‍ॅप कॉल करु शकतात. मित्रांचा एक मोठा ग्रुप या फिचरमुळे ऑनलाईन व्हिडीओ कॉलद्वारे कनेक्ट होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपचे चॅनेल

व्हॉट्सअ‍ॅपने अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल फिचर आणले आहे. कोणताही युजर याद्वारे स्वतःचे चॅनेल सुरु करु शकतो. हे एक ब्रॉडकास्टिंग चॅनेल असून याद्वारे मोठ्या संख्येच्या ग्रुपला अपडेट्स पुरवता येणार आहेत. १५० पेक्षा जास्त देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने चॅनेल फिचर लाईव्ह केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

AI Toys Ban : लहान मुलांचे 'बोलके खेळणे' ठरू शकते खतरनाक! सरकारने घेतली मोठी अ‍ॅक्शन; काय मार्केटमधून गायब होतील सगळे गॅजेट्स?

Latest Maharashtra News Updates Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा; चंपा चौकात सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त

Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Hardik Pandya : २० षटकार, ११ चौकार... हार्दिक पांड्याला आली लहर अन् करतोय कहर; १९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक अन्...

SCROLL FOR NEXT