whatsapp new update 1024 participants in group premium subscription feature in beta update details  
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Update: 'व्हॉट्सअ‍ॅप'मध्ये येतंय खास अपडेट, वाढणार ग्रुपमधील सदस्यांची संख्या

सकाळ डिजिटल टीम

मेटा कंपनीच्यामालकीचे सुप्रसिध्द इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना नवीन सुविधा आणि नवीन फीचर्स देण्यासाठी सतत काहतरी नवीन करत असता. आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetaInfo नुसार व्हॉट्सअ‍ॅप आता ग्रुपमधील अॅड सदस्यांची मर्यादा वाढवणार आहे. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 1024 सदस्य जोडता येतील.

या वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपमधील ग्रुप सदस्यांची संख्या बदलत 256 सदस्यांवरून 512 सदस्य करण्यात आली होती. आता व्हॉट्सअ‍ॅप हा नंबरही दुप्पट करण्याचा विचार करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने सध्या हे फीचर बीटा टेस्टर्सपुरते मर्यादित केले आहे. लवकरच हे फीचर इतर युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकते. असा दावाही केला जात आहे की व्हॉट्सअॅप 2GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करण्यासाठीचे अपडेट जारी करणार आहे.

WhatsApp प्रीमियम (WhatsApp Premium)

व्हॉट्सअ‍ॅपने बिझनेस अ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील सुरू केले आहे, जरी या क्षणी फक्त काही मोजक्याच वापरकर्त्यांना त्याचे अपडेट मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅप प्रीमियमचे अपडेट बीटा वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. बीटा वापरकर्ते त्यांच्या अॅपमध्ये प्रीमियम मेनू पाहू शकतात. वापरकर्त्यांना प्रीमियम मेनूमध्ये अनेक अतिरीक्त फीचर्स मिळतील.

मात्र प्रीमियम सब्सक्रिप्शन हे केवळ बिझनेस अ‍ॅपसाठी आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सामान्य वापरकर्ता असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रीमियम सबस्क्रिप्शन अंतर्गत, बिझनेस अ‍ॅप वापरकर्त्याला कॉन्टॅक्ट लिंक कस्टमाइझ करण्याचा पर्याय मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT