WhatsApp Newsletter esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp च्या या फीचरमुळे वाढणार Twitter अन् YouTube ची काळजी, काय आहे खास?

व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर आणत आहे. ज्याला WhatsApp Newsletter नाव देण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Newsletter : व्हॉट्सअ‍ॅपने आयुष्य बऱ्यापैकी सोप केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून तिकीट बुकींग, फूड ऑर्डर, पेमेंट अशा बऱ्याच गोष्टी करता येतात. पण आता व्हॉट्सअ‍ॅप असं फीचर आणत आहे ज्याची लोक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. व्हॉट्सवाटप लवकरच न्यूजलेटर फीचर रोलआउट करू शकतो. रिपोर्टनुसार हे एक ब्रॉडकॉस्टिंग इंफॉर्मेशन टूल असेल. या फीचरच्या मदतीने यूझर्स यूजफूल इंफॉर्मेशन मिळवू शकतो. हे एक नवीन टूल असेल जिथे लोकल ऑफिसर, स्पोर्ट टीम आणि इतर ऑर्गनायझेशन माहिती सर्क्युलेट करू शकतो.

ट्वीटर आणि गुगलचं वाढणार टेंशन

सध्या कोणतीही इंफॉर्मेशन देण्यासाठी स्पोर्ट्स टीम, ऑफीसर हे ट्वीटरचा आधार घेतात. किंवा न्यूज पोर्टल आणि चॅनेलच्या माध्यमातून अपडेटेड माहिती देतात. त्यानंतर गुगल आणि यू-ट्युबच्या माध्यमातून लोकांमध्ये पोहचवली जाते. पण लवकरच व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने कोणतीही व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन युझर्सला माहिती देऊ शकतो. यासाठी युझर्सला काही काँटॅक्ट सेव्ह करावे लागतील. ज्यावरुन तुम्हाला अचुक माहिती मिळू शकेल.

त्यामुळे असे मानले जात आहे की, व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमुळे यू-ट्युब आणि ट्वीटरला जोरदार टक्कर देण्यात येईल.

ही सर्व्हिस फ्री असेल

ट्वीटर आणि यू-ट्युब दोन्हीही सबस्क्रिप्शन मॉडेलवर जात आहे. ज्यासाठी युझरला दरमहा ६०० ते ९०० रुपये चार्ज द्यावा लागेल. तर यू-ट्युबचं मंथली सबस्क्रिप्शन १२५ रुपये आहे. पण व्हॉट्सअ‍ॅप पूर्णपणे फ्री आहे. शिवाय एंड टू एंड सबस्क्रिप्शनसह येतो. अशात WhatsApp Newsletter लाँच झाल्यावर Youtube, Google आणि Twitter ची काळजी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT