Whatsapp New Features : व्हॉट्सअॅपच्या पोल फिचर हे खूपच कामाचे आहे. यामुळे मतं गोळा करणं आणि ग्रुपने निर्णय घेणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांसाठी या उपयुक्त फिचरचा उपयोग केला जात आहे. कार्यक्रम ठरवण्यासाठी, अभिप्राय गोळा करण्यासाठी किंवा निवडी सुलभ करण्यासाठी हा फिचर प्रभावी ठरत आहे. मात्र, अनेकांना या फिचरबद्दल अद्याप पुरेशी माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅप पोल कसे तयार करायचे याबद्दल सांगणार आहोत.
व्हॉट्सअॅप पोल हे एक साधं आणि उपयोगी फीचर आहे, ज्याद्वारे वापरकर्ते ग्रुपमध्ये प्रश्न विचारून 12 पर्याय पर्यंत मतं मागवू शकतात. सहभागी सदस्य त्यांच्या निवडीसह रिअल-टाइम निकाल पाहू शकतात. तसेच, एका पेक्षा अधिक पर्याय निवडायचा आहे का, हे वापरकर्त्यांना नियंत्रित करता येते.
1. इच्छित चॅट उघडा.
2. पेपरक्लिप आयकॉनवर (attachment) टॅप करा.
3. "Poll" पर्याय निवडा.
4. प्रश्न लिहा आणि 12 पर्याय पर्यंत निवड जोडा.
5. पर्यायांची क्रमवारी बदलण्यासाठी त्यांना ड्रॅग करा.
6. "Allow Multiple Answers" टॉगल करा (आवश्यक असल्यास बंद करा).
7. "Send" बटणावर टॅप करून पोल पाठवा.
1. आवश्यक चॅट उघडा.
2. संदेश बॉक्सजवळ "+" चिन्हावर टॅप करा.
3. "Poll" निवडा.
4. प्रश्न व पर्याय लिहा.
5. पर्यायांची क्रमवारी बदलण्यासाठी ड्रॅग करा.
6. "Allow Multiple Answers" टॉगल करा.
7. "Send" वर टॅप करून पोल शेअर करा.
1. पोल असलेला चॅट उघडा.
2. हवे असलेले पर्याय निवडा.
3. मत बदलण्यासाठी दुसरा पर्याय टॅप करा किंवा तेच मत कॅन्सल करण्यासाठी डबल टॅप करा.
4. सर्व निकाल रिअल-टाइममध्ये अपडेट होतात.
1. पोल असलेल्या चॅटमध्ये जा.
2. पोलवर "View Votes" बटणावर टॅप करा.
3. प्रत्येक सदस्याची निवड आणि निकाल तपशीलवार पाहा.
Poll कसा डिलीट कराल?
1. पोल असलेला चॅट उघडा.
2. पोलच्या वरच्या उजव्या कोपर्यातील डाउन अॅरोवर टॅप करा.
3. "Delete" निवडा आणि "Delete for Everyone" किंवा "Delete for Me" पर्याय निवडा.
1. पोल असलेला चॅट उघडा.
2. पोलच्या वरच्या उजव्या कोपर्यातील डाउन अॅरोवर टॅप करा.
3. "Delete" निवडा आणि "Delete for Everyone" किंवा "Delete for Me" पर्याय निवडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.