WhatsApp Profile Picture eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Profile Picture : आता कोणाचाही फोटो करता येणार नाही सेव्ह; व्हॉट्सअ‍ॅपने बंद केला प्रोफाईल पिक्चर स्क्रीनशॉट ऑप्शन

DP Screenshot : गेल्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत कित्येक मोठे निर्णय घेतले आहेत.

Sudesh

WhatsApp Profile Picture Screenshot : व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत. या मेसेजिंग अ‍ॅपवर यूजर्सना आपल्या प्रोफाईलला फोटो देखील ठेवता येतो. आपण इतरांचे प्रोफाईल पिक्चर पाहू शकतो. मात्र आता इतर कोणत्या व्यक्तीच्या फोटोचा स्क्रीनशॉट घेणं यूजर्सना शक्य होणार नाही. आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत कित्येक मोठे निर्णय घेतले आहेत. यातीलच एक मोठा निर्णय म्हणजे यूजर्सना आता इतरांच्या डीपी, म्हणजेच डिस्प्ले पिक्चरचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही. काही दिवसांपूर्वी या फीचरची चाचणी सुरू होती. मात्र आता हे फीचर सर्वांसाठी रोलआउट करण्यात आलं आहे.

डीपीला असणाऱ्या फोटोंचा स्क्रीनशॉट घेऊन त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे हे फीचर लाँच केलं आहे. सध्या काही ठराविक स्मार्टफोनमध्ये हे लागू झालं असून, टप्प्या-टप्प्याने सर्वांनाच लागू होईल. यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.

सेफ्टी फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅप नवीन लाँच झालं होतं तेव्हा यूजर्सना एकमेकांच्या डिस्प्ले पिक्चरचा फोटो सेव्हदेखील करता येत होता. मात्र 2019 साली हे फीचर बंद करण्यात आलं. यानंतर प्रोफाईल पिक्चरच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअ‍ॅपने काही आणखी सेटिंग्स लाँच केल्या होत्या. तुमचा डीपी कोण पाहू शकतं यासाठी 'एव्हरीवन', 'माय कॉन्टॅक्ट', 'माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट..' आणि 'नोबडी' असे चार पर्याय उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT