Do you know about this feature of WhatsApp Nagpur news 
विज्ञान-तंत्र

Whatsapp Feature: आता व्हॉट्सअ‍ॅपवर घेता येणार नाही 'स्क्रीनशॉट'!

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या घडीला मॅसेजिंगच कोणतं अ‍ॅप पॉप्युलर असेल तर ते म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. यात नवनवे फीचर्स आले की युजर्सचा पण फन एक्सपिरियन्स वाढतो. पण आता कंपनी एक नवं फिचर आणते आहे ज्यामुळे काही युजर्सचा उत्साह दुणावेल तर काहींना हे फिचर आवडणार नाही.

हे फिचर म्हणजे तुम्हाला आता व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही. पण हे फिचर खरं तर सरसकट लागू होणार नाहीये. तर व्ह्यू वन्स हे जे फिचर आहे त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येणार नाहीये. म्हणजे व्ह्यू वन्स हे फीचर वापरून एखाद्याने तुम्हाला इमेज पाठवली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घेता येणार नाही.

व्ह्यू वन्स हे फिचर इन्स्टाग्रामवर पण उपलब्ध आहे. सेम असंच फिचर व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्सना दिलं. पण लोक या फीचरमधून सुद्धा पळवाट काढायला लागले. कंपनीकडे अशा तक्रारी आल्या की लोक याचे स्क्रीनशॉट घेतात आणि तो फोटो सेव्ह करतात.

त्यामुळे व्ह्यू वन्स या फिचरचा तसा पाहायला गेलं तर काहीच उपयोग नाही. पण WABetaInfo या वेबसाईटवर आलेल्या एका रिपोर्टनुसार आता ही पळवाट सुद्धा बंद करण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना व्ह्यू वन्स या फीचरमधून काही फोटो पाठवले असतील तर त्याचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीयेत.

पण जर एखाद्याने चलाखीने व्ह्यू वन्स वरून पाठवलेल्या इमेजचा स्क्रीन शॉट घेतला किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलं तर ते देखील ब्लॉक होईल. म्हणजेच, जर कोणी स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर तो शॉट काळा दिसेल. Netflix, Disney +Hotstar आणि Amazon Prime Video सारख्या अनेक OTT अ‍ॅप्सवर सुद्धा असे स्क्रीनशॉट घेता येत नाहीत.

रिपोर्ट मध्ये असंही म्हटलंय की थर्ड पार्टी अ‍ॅप हे ब्लॉकिंग फीचर बायपास करू शकत नाही. पण जर एखाद्याने दुसऱ्या फोनमध्ये फोटो काढला तर त्यावर काही करता येण्यासारखं नाही. पण स्क्रीनशॉट घेतला असेल तर मात्र तुम्हाला स्क्रीनशॉट ब्लॉक केल्याचा मॅसेज मिळेल. 

सध्या हे फिचर बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. पण येत्या काळात व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध करून दिले जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

Dubai Work Reality : दुबईतील झगमगाटामागे दडलंय भयाण वास्तव! भारतीय तरुणाने अवघ्या २ मिनिटांत दाखवली काळी बाजू, पाहा VIDEO

‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ पाठराखीण मालिकेतील अभिनेत्रींचा मराठमोळ्या लूकमध्ये भन्नाट डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : पुण्यात पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता दोन शहराध्यक्ष

Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

SCROLL FOR NEXT