Whatsapp Accounts Hacked Cyber Security Tips esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Hacking : अलर्ट! अचानकपणे 900 लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप झाले हॅक; तुमचे अकाऊंटही असू शकते धोक्यात, सिक्युरिटी चेक करा एका क्लिकवर

Whatsapp Accounts Hacked Cyber Security Tips : व्हॉट्सअ‍ॅपवर अचानकपणे अनेक वापरकर्त्यांचे अकाऊंट हॅक झाले आहेत. या प्रकरणात मेटाने इजरायली हॅकिंग कंपनी 'पॅरागॉन सोल्यूशन्स'विरोधात कारवाई केली आहे.

Saisimran Ghashi

Whatsapp Security Tips : व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षेशी संबंधित मोठा खुलासा झाला आहे. Metaने माहिती दिली आहे की इस्रायली हॅकिंग कंपनी Paragon Solutionsने WhatsAppच्या अंदाजे 900 यूजर्सचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे युजर्स प्रामुख्याने पत्रकार आणि सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत, आणि बहुतांश पीडित युरोपमधील असल्याचे समोर आले आहे.

WhatsApp हॅकिंग कसे झाले?

Metaच्या मते, हॅकर्सनी स्पायवेअर इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटच्या स्वरूपात पाठवले, ज्यामुळे युजर्सच्या डिव्हाइसमध्ये अनपेक्षितपणे मालिशस सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले. विशेष म्हणजे, युजर्सला कोणताही संशय येऊ न देता हा हल्ला करण्यात आला. या सायबर हल्ल्याचा फटका दोन डझनहून अधिक देशांतील लोकांना बसला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या हॅकिंग प्रकरणावर Metaने तातडीने Paragon Solutions विरोधात "cease-and-desist" नोटीस पाठवली आहे, ज्यात त्यांच्या हॅकिंग ऑपरेशनला थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधीही इस्रायली स्पायवेअर कंपन्यांमार्फत अशा हॅकिंग हल्ल्यांचे प्रकार समोर आले होते.

WhatsApp युजर्ससाठी Metaचे आश्वासन

Metaने युजर्सना आश्वासन दिले आहे की त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांपासून युजर्सचे अकाउंट सुरक्षित राहतील यासाठी सुरक्षा यंत्रणेत सुधारणा केली जात आहे.

ही घटना पेगॅसस स्पायवेअर प्रकरणाशी मिळतीजुळती आहे, जिथे अनेक पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हॅकिंगद्वारे माहिती चोरली गेली होती. सत्ताधारी यंत्रणांद्वारे हेरगिरीसाठी स्पायवेअरचा वापर केला जात असल्याने पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी संस्थांच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हॅकिंग प्रकरणाचा पुढील तपास सुरू

Metaच्या या दाव्यानंतर Paragon Solutionsकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, Citizen Lab या कॅनडातील इंटरनेट वॉचडॉग संस्थेच्या मते, Paragon ही कंपनी सरकारांना राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली स्पायवेअर विकते. परंतु, हा तंत्रज्ञान गैरवापर पत्रकार आणि नागरी संस्थांना लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे.

Metaने यावेळी हा हल्ला मध्यंतरीच रोखण्यात यश मिळवले असल्याचा दावा केला आहे, मात्र Paragon Solutionsचा संबंध ह्या हल्ल्याशी कसा जोडला गेला हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, आणि अनोळखी स्त्रोतांकडून आलेले कोणतेही संदेश किंवा फाईल्स उघडण्यापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT