WhatsApp  Google
विज्ञान-तंत्र

WhatsApp स्टेटससाठी येतंय Undo बटण, चूक झाल्यास येणार कामी

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp त्याच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सतत काहीतरी नवीन घेऊन येत राहते. फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग अ‍ॅप फोटो एडीट करण्यासाठी Undo आणि Redo या दोन नवीन बटणांवर काम करत आहे. नुकत्याच झालेल्या एका रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, कंपनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससाठी नवीन Undo बटण आणणार आहे. या बटणमुळे तुम्ही स्टेटस ठेवताना काही चूक झाली तर ती लगेच दुरुस्त करता येणार आहे. त्याबद्दल अधिक डिटेल्स जाणून घेऊया..

कसे असेल हे फीचर

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp एका खास फीचरवर काम करत आहे, ते फीचर आल्यानंतर वापरकर्त्यांना चूकून पोस्ट केलेले स्टेटस अपडेट लगेच डिलीट करता येईल. यासाठी अ‍ॅपमध्ये Undo बटण दिले जाईल. हे बटण Status Sent मेसेजच्या पुढेच दिले जाईल. म्हणजेच, तुम्हाला स्टेटस ठेवताच तुम्ही दुरुस्ती करू शकता. बऱ्याच वेळा असे होते की अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने स्टेटसवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केले जातात.

मात्र आता वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस डिलीट करण्याचा पर्याय आधीच मिळतो. याआधी वापरकर्त्यांना स्टेटस सेक्शन मध्ये जाऊन स्टेटस सिलेक्ट करावे लागत असे आणि त्यानंतर तुम्ही ते डिलीट करू शकत होता. या वेळेत तुमच्या कॉन्टॅक्टमधील बरेच जण कदाचित ते स्टेटस पाहू शकतात. अशा परिस्थितीत, हे नवीन देण्यात आलेले फीचर तुम्हाला कामी येईल.

जेव्हा तुम्ही स्टेटस अपडेट Undo कराल, तेव्हा तुम्ही ते डिलीट देखील करू शकता. तुम्ही स्टेटस डिलीट केल्यावर WhatsApp तुम्हाला त्याबद्दल माहिती देईल. Status Update साठी Undo बटण सध्या WhatsApp बीटाच्या Android व्हर्जन 2.21.22.6 वर टेस्ट केले जात आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, ते सर्व वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत बनत आहेत 4 मोठे राजयोग; माता लक्ष्मीच्या कृपेने 'या' राशी होणार मालामाल, करिअरमध्येही प्रगतीचे संकेत

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

SCROLL FOR NEXT