विज्ञान-तंत्र

WhatsApp वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता लवकरच Android मधून iOS वर चॅट ट्रान्सफर शक्य

सकाळ डिजिटल टीम

पुणे : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्याला बरीच वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर काही फीचर्स असे देखील आहेत जी आपल्याला चॅटदरम्यान एक वेगळाच अनुभव देतात. त्याचबरोबर  कंपनी देखील आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन  नवीन फीचर्स बाजारात आणत आहे. नुकतेच समोर आलेल्या एका नवीन अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅप एका फीचरची चाचणी घेत आहे जे वापरुन वापरकर्ते सहजपणे एंड्रॉइड चॅट आयओएसवर ट्रान्सफर करू शकतील.

Wabetainfo  रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरची चाचणी करीत आहे. ज्याला चॅट हिस्ट्री माइग्रेशन फीचर असे नाव दिले जाईल. या फीचरच्या रोलआऊटनंतर Android वापरकर्ते त्यांच्या चॅट सहज iOS वर ट्रान्सफर करु शकतील. हे फीचर वापरकर्त्यांसाठी मजेदार तसेच अत्यंत उपयुक्त ठरेल. हे खासकरुन अशा वापरकर्त्यांसाठी सादर केले जात आहे जे Android वरून iOS वर शिफ्ट करत आहेत. म्हणजेच, जर आपण अँड्रॉईड फोन वापरणारे देखील असाल आणि आयओएस डिव्हाइस खरेदी करत असाल तर आपण व्हॉट्सअॅप चॅट अगदी सहजपणे ट्रान्सफर करु शकाल.

व्हॉट्सअ‍ॅपचे हिस्ट्री माइग्रेशन फीचर 

जेव्हा आपण Android फोनवरून iOS वर शिफ्ट करता तेव्हा आपल्या व्हॉट्सअॅपचा चॅट हिस्चरी आपोआप गायब होते. ज्यामुळे आपल्या बर्‍याच महत्वाच्या चॅट मिस होतात. यासाठी, आपल्याला एकतर बॅकअप घ्यावा लागेल आणि ते सेव्ह करावे लागेल किंवा आपल्याला थर्ड पार्टी अ‍ॅपची आवश्यकता असेल. परंतु आता असे होणार नाही, कारण तुमच्या पर्सनल चॅटची हिस्री माइग्रेशन फीचर आल्यानंतर युजर्सना त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अपडेट करावे लागेल. ज्यानंतर आपणास व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट ट्रान्सफरचा पर्याय मिळेल. तरच आपण कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीशिवाय आपल्या चॅट Android वरून सहज iOS वर हस्तांतरित करू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT