WhatsApp New Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp File Sharing Feature : आता ब्लूटूथ प्रमाणे शेअर करता येणार मोठ्या फाईल्स; व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फीचर - रिपोर्ट

WhatsApp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आल्यापासून एकमेकांना फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल्सही पाठवणं अगदी सोपं झालं आहे. मात्र, यावर सध्या ठराविक मर्यादेपर्यंत साईजच्या फाईल्स पाठवता येतात.

Sudesh

WhatsApp File Sharing Feature : आपल्या अब्जावधी यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सातत्याने नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. आता यूजर्सना मोठ्या फाईल्स सोप्या पद्धतीने शेअर करता याव्यात यासाठी कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे. पूर्वी ज्याप्रमाणे ब्लूटूथने फाईल्स शेअर करत होतो, त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन शेजारी असलेल्या व्यक्तीला फाईल्स पाठवता येणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप आल्यापासून एकमेकांना फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल्सही पाठवणं अगदी सोपं झालं आहे. मात्र, यावर सध्या ठराविक मर्यादेपर्यंत साईजच्या फाईल्स पाठवता येतात. सोबतच यासाठी डेटाही खर्च होतो. मात्र, नवीन फीचरमुळे या अडचणी दूर होणार आहेत. WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.

शेजारच्या व्यक्तीला पाठवा फाईल

या नव्या फीचरमुळे तुम्हाला शेजारी असणाऱ्या व्यक्तींसोबत फाईल्स शेअर करता येतील. शेअर टू पीपल निअरबाय (People Nearby Feature) असं या फीचरचं नाव असणार आहे. याच्या माध्यमातून यूजर्स 2GB एवढ्या साईजच्या फाईल्स देखील शेअर करू शकणार आहेत. (WhatsApp New Features)

चाचणी सुरू

हे फीचर सध्या टेस्टिंग स्टेजमध्ये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर आधी देण्यात येईल. त्यानंतर चाचणी पूर्ण झाल्यानंतर हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, फाईल शेअरिंगसाठी दोन्ही फोनच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फीचर अपडेटेड असणं गरजेचं आहे. त्याशिवाय फाईल शेअरिंग करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT