WhatsApp Ads News eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Ads : पैसे कमावण्यासाठी मेटाचा नवा फंडा, आता व्हॉट्सअ‍ॅपवरही दिसणार जाहिराती? काय म्हणाली कंपनी?

Ads on WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपवर आता जाहिराती पहाव्या लागणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

Sudesh

व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅपपैकी एक आहे. भारतातही या अ‍ॅपचे कोट्यवधी यूजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी यूजर्सना कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नाहीत. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपवर आता जाहिराती पहाव्या लागणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

मेटा या कंपनीचं रेव्हेन्यू मॉडेल हे बऱ्याच अंशी जाहिरातींवर अवलंबून आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक याठिकाणी मिळत असणाऱ्या जाहिरातींमधून ही कंपनी पैसे कमावते. अशाच प्रकारची सिस्टीम आता व्हॉट्सअ‍ॅपवरही लागू करण्यात येणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं.

कंपनीने फेटाळला दावा

व्हॉट्सअ‍ॅप आणि मेटाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे, माध्यमांमधील वृत्त हे पूर्णपणे खोटं असून, अशा प्रकारचा कोणताही विचार सध्या सुरू नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी एका एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दिसणार अशा प्रकारची बातमी एका मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आली होती. याला रिप्लाय देत कॅथकार्ट यांनी हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.

नुकतंच लाँच केलं चॅनल्स फीचर

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने नुकतंच 150 देशांमध्ये आपलं चॅनल्स फीचर लाँच केलं आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. या माध्यमातून यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतःचं ब्रॉडकास्ट चॅनल सुरू करु शकणार आहेत. तसंच, इतर चॅनल्स जॉईन करू शकणार आहेत. टप्प्या टप्प्याने हे फीचर सर्वांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT