WhatsApp Verified eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Verified : आता फेसबुक-इन्स्टाप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार 'ब्लू टिक'; सोपी आहे व्हेरिफिकेशन प्रक्रिया

WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बिझनेस अकाउंट असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना सेटिंग्समध्ये एक नवीन पर्याय मिळणार आहे.

Sudesh

WhatsApp Verification Badge : व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. लवकरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सनाही ब्लू टिक मिळणार आहे. मेटाने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाउंट असणाऱ्यांना या फीचरचा फायदा होणार आहे.

WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बिझनेस अकाउंट असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना सेटिंग्समध्ये एक नवीन पर्याय मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना बिझनेस मेटा व्हेरिफिकेशन विकत घेण्याचा ऑप्शन मिळेल. यामुळे आपलं बिझनेस अकाउंट अधिकृत आहे हे यूजर्सना दाखवता येणार आहे. (WhatsApp Business)

बिझनेस अ‍ॅप

यासाठी यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपचं बिझनेस अ‍ॅप घ्यावं लागेल. त्यामध्ये बिझनेस अकाउंटवरुन लॉग-इन करावं लागेल. यानंतर यूजर्स ब्लू टिक खरेदी करू शकतील. याची किंमत किती असेल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल, त्यावेळी कदाचित ही किंमत जाहीर केली जाऊ शकते. (WhatsApp Verified - Business app)

बिझनेस अ‍ॅपचा फायदा

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपमध्ये रेग्युलर अ‍ॅपच्या तुलनेत अधिक फीचर्स असतात. यामध्ये ऑटो रिप्लाय आणि इनसाईट्स पाहण्यासाठी अधिक टूल्स देण्यात आले आहेत. छोट्या व्यापाऱ्यांसाठी याचा भरपूर फायदा होतो. आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या प्रमोशनसाठी हे अ‍ॅप फायद्याचं आहे. आता व्हेरिफिकेशन बॅज मिळाल्यामुळे देखील व्यापाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. (Business App Advantage)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT