WhatsApp Update esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Update : तुम्हाला माहितीये का, आता एकाच नंबरने चालवता येणार दोन व्हॉट्सअ‍ॅप...

कमी वेळात फारच अंगवळणी पडलेली मेसेजिंग सिस्टीम व्हॉट्सअ‍ॅप एकाच फोनवर चालवण्यासाठी आता दोन वेगवेगळे नंबर घेण्याची गरज पडणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Update : संपूर्ण जगात फार कमी वेळात अत्यंत लोकप्रिय झालेली मेसेजिंग सिस्टिम व्हॉट्सअ‍ॅप आहे. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असतंच. हल्ली लोक याचा वापर फक्त चॅटिंग साठी नाही तर बिझनेस वाढवण्यासाठी तसेच अनेक कामांसाठी करतात. यावरून जसं मित्रांशी गप्पा मारल्या जातात तसंच ऑफिसचं काम आणि बिझनेसही केला जातो.

त्यामुळे बऱ्याचदा लोकांना दोन व्हॉट्सअ‍ॅप अकांउंटची आवश्यकता पडते. मग त्यासाठी ते दोन नंबर घेतात. पण अशा लोकांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी आणली आहे.

आता तुम्हाला दोन व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ओपन करण्यासाठी दोन वेगवेगळे नंबर घेण्याची गरज नाही. एकाच नंबरवरुन आता तुम्हाला दोन व्हॉट्सअ‍ॅप सुरु करता येणार आहेत. कंपनीने असे अक फिचर लाँच केले आहे की, जे तुम्हाला एकाच नंबर वरुन एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याची परवानगी देतं. पण आजही लोकांना एकाच फोनमध्ये दोन अ‍ॅप कसे वापरायचे हे माहित नाही.

Oppo, Xiaomi, Vivo, Huawei, Samsung, OnePlus, Realme यासारखे काही स्मार्टफोन उत्पादक त्यांच्या फोनमध्ये ड्युएल अ‍ॅप सपोर्ट देतात. ज्यामुळे तुम्हाला एकाच फोनमध्ये दोन समान अ‍ॅप्स चालवता येतात. यात तुम्ही थर्डपार्टी अ‍ॅप डाऊनलोड न करता एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप चालवू शकतात. कसं त् जाणून घेऊया.

काय करावं?

  • पहिले तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये जा.

  • त्यानंतर खाली स्क्रोल करून अ‍ॅप्सवर जावे लागेल.

  • जेव्हा तुम्ही अ‍ॅप्सवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला ड्युएल अ‍ॅप्सचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला क्रिएटवर क्लिक करावं लागेल.

  • नंतर ड्युएल अ‍ॅप्स सपोर्टेड अ‍ॅप्समधून व्हॉट्सअ‍ॅपची निवड करा.

  • नंतर ड्युएल अ‍ॅप्सच्या पुढे टॅप करा आणि थोडी प्रतिक्षा करा.

  • त्यानंतर अ‍ॅप लाँचवर जावे लागेल.

  • ड्युएल आयकॉन व्हॉट्सअ‍ॅपवर जा. आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT