WhatsApp Username Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Username Feature : आता 'यूजरनेम' वापरुन सर्च करता येणार व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट, मोबाईल नंबरची नाही गरज

WhatsApp New Feature : इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर अकाउंट सुरू करताना ज्याप्रमाणे आपल्याला एक युनिक यूजरनेम मिळतं, तसंच हे असणार आहे.

Sudesh

एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करायचा असेल, तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅप ही प्रक्रिया आणखी सोपी करणार आहे. आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ यूजरनेमच्या मदतीने देखील एकमेकांना शोधू, किंवा संपर्क करू शकणार आहे. यामुळे मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही.

इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर अकाउंट सुरू करताना ज्याप्रमाणे आपल्याला एक युनिक यूजरनेम मिळतं, त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्याला यूजरनेम देणार आहे. एका व्यक्तीचं यूजरनेम हे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळं असणार आहे. हे यूजरनेम सर्च केल्यानंतर त्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकणार आहोत.

हे फीचर सध्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध असल्याची माहिती WABetaInfo या वेबसाईटने दिली आहे. ही कंपनी व्हॉट्सअ‍ॅपवर होत असलेल्या नवनवीन चाचण्यांची माहिती देत असते. या फीचरची बीटा चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (Tech News)

यूजर्सच्या सुरक्षेसाठी निर्णय

आपल्या यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षितता राखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन अपडेट्स आणत असतं. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने चॅट्ससाठी एक्स्ट्रा लॉक फीचर लाँच केलं होतं. यामुळे यूजर्स ठराविक चॅट वेगळ्या पासवर्डने लॉक करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT