Whatsapp Web Voice Video Call Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Web New Feature : व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये झाली जबरदस्त फीचरची एंट्री; अ‍ॅप डाऊनलोडची गरजच नाही, हे फीचर वापरा एका क्लिकवर

Whatsapp Web Voice Video Call Feature : व्हॉट्सअ‍ॅप वेबवर आता थेट ब्राऊझरमधून कॉल संबंधित नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. हे फीचर काय आहे आणि कसे वापरायचे जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Whatsapp Web Calling Feature : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरताना थेट ब्राऊझरवरून व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार असून यासाठी वेगळं डेस्कटॉप अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. हे नवं अपडेट सध्या बीटा चाचणी टप्प्यात असून लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

ब्राऊझरमध्ये दिसतील कॉलचे नवीन पर्याय

जगभरात ३.५ अब्जांहून अधिक वापरकर्ते असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी हे नवं वैशिष्ट्य उपलब्ध करून दिलं आहे. यापूर्वी, संगणकावरून व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करायचा असेल तर विंडोज किंवा मॅकसाठी खास अ‍ॅप डाऊनलोड करणं आवश्यक होतं. मात्र आता फक्त ब्राऊझरमधूनच कॉल करता येणार आहे ज्यामुळे विशेषतः ऑफिसमध्ये वेब व्हर्जन वापरणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या नव्या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये चॅट बटणाशेजारीच फोन आणि कॅमेरा आयकॉन्स दिसणार आहेत, ज्यावर क्लिक करून थेट कॉल करता येईल. ही सुविधा वापरणं अतिशय सोपं असून यामुळे कॉलिंगची प्रक्रिया अधिक गतीशील आणि सुलभ होणार आहे. हे सर्व करताना सुरक्षेलाही तितकंच महत्त्व देण्यात आलं आहे.

WABetaInfo ने दिली माहिती

व्हॉट्सअ‍ॅपवरील अपडेट्ससाठी ओळखलं जाणारं WABetaInfo या वेबसाइटने या नव्या सुविधेबद्दल प्रथम माहिती दिली. त्यांच्या रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये चाचणीसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.

प्रायव्हसीसाठी ‘Advanced Chat Privacy’ अपडेट

व्हॉईस व व्हिडिओ कॉलिंगसह अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे ‘Advanced Chat Privacy’. या नव्या सेटिंगमुळे वापरकर्ते त्यांचे चॅट्स एक्सपोर्ट होण्यापासून किंवा शेअर होण्यापासून वाचवू शकतात. संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेसाठी हे एक प्रभावी पाऊल मानलं जात आहे.

Meta कंपनीकडून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सतत नवे बदल करण्यात येत आहेत. अलीकडेच वापरकर्त्यांना HD प्रतिमांमध्ये फोटो व व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा, स्टेटसवर गाणी शेअर करण्याचा पर्याय आणि अनेक इतर नव्या फिचर्स देखील देण्यात आले आहेत.

ही सर्व नवकल्पना एकत्र येऊन वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक डिजिटल संवादाचा अनुभव देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

President's Medal: 'सोलापूर शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त मानेंना राष्ट्रपती पदक'; जिल्ह्यातील नऊजणांना विशेष सेवा पदके

Panchang 15 August 2025: आजच्या दिवशी “शुं शुक्राय नमः” मंत्राचा 108 जप करावा

Independence Day 2025 : गुलामीच्या अंधारातून तेजोमय स्वातंत्र्य घेऊन येणारी कशी होती १५ ऑगस्ट १९४७ ची ती सुवर्ण सकाळ!

आजचे राशिभविष्य - 15 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT