WhatsApp New Update : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप असणारं व्हॉट्सअॅप हे सुरुवातीपासूनच हिरव्या-पोपटी अशा रंगात उपलब्ध होतं. मात्र, आता यूजर्सना याचा रंग बदलता येणार आहे. यासाठी कंपनी लवकरच थीम फीचर लाँच करणार आहे. हे फीचर सध्या बीटा यूजर्ससाठी उपलब्ध झालं आहे.
व्हॉट्सअॅप अपडेट्सबद्दल माहिती देणाऱ्या WAbetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. आपल्या एक्स हँडलवरुन कंपनीने याची पोस्ट केली आहे. सध्या हे फीचर केवळ बीटा फॉर iOS 24.1.10.70 या व्हर्जनवर उपलब्ध आहे.
या फीचरची चाचणी सुरू असून, भविष्यात हे सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतं असं या वेबसाईटने म्हटलं आहे. यामुळे आता यूजर्स आपल्या आवडीनुसार व्हॉट्सअॅपचा रंग बदलता येणार आहे. (Tech News)
व्हॉट्सअॅपने नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. यानंतर आता यूजर्सचा चॅट बॅकअप थेट गुगल ड्राईव्हवर होणार आहे. त्यामुळे जर गुगल ड्राईव्हवर पुरेशी जागा उपलब्ध नसेल, तर डेटा बॅकअप होणार नाही. किंवा मग तुम्हाला अधिक जागा विकत घ्यावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.