Indian Engineer Joins Meta Superintelligence Labs | Who is Trapit Bansal sakal
विज्ञान-तंत्र

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

IIT graduate Trapit Bansal receives billion-dollar offer from Meta: IIT कानपूरचे त्रपित बंसल Meta च्या सुपर प्रोजेक्टमध्ये 854 कोटींच्या पॅकेजसह सहभागी झाले आहेत!

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. IIT कानपूरचे पदवीधर त्रपित बंसल आता Meta च्या Superintelligence Labs मध्ये 854 कोटींच्या पॅकेजसह सहभागी झाले आहेत.

  2. त्यांनी गणित, सांख्यिकी आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेतलं असून AI च्या विविध शाखांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे.

  3. OpenAI मध्ये अनुभव घेतल्यानंतर ते आता Meta च्या AGI प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

Meta Hires IIT Graduate with Highest Package: एका सामान्य भारतीय विद्यार्थ्याचा प्रवास जेव्हा जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एका कंपनीच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचा भाग होतो, तेव्हा तो केवळ करिअरचा टप्पा राहत नाही, तर ती एक प्रेरणादायक कहाणी बनते. अशीच एक कहाणी आहे त्रपित बंसल याची. IIT कानपूरमधून शिक्षण घेतलेल्या या तरुणाने आता Meta च्या Superintelligence Labs मध्ये थेट 854 कोटी रुपयांच्या पॅकेजसह एन्ट्री घेतली आहे. त्याबद्दल पुढे जाणून घेऊया.

कोण आहे त्रपित बंसल?

त्रपित बंसल हा IIT कानपूरचा माजी विद्यार्थी असून त्याने गणित (Mathematics) आणि सांख्यिकी (Statistics) या दोन विषयांमध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर त्याने University of Massachusetts Amherst येथून Computer Science मध्ये PhD पूर्ण केली. त्याचे Deep Learning, Meta Learning आणि Natural Language Processing (NLP) या आधुनिक AI शाखांमध्ये विशेष प्राविण्य आहे.

Meta चा प्रकल्प

Meta ही कंपनी सध्या आपल्या Superintelligence Labs च्या माध्यमातून Artificial General Intelligence (AGI) तयार करण्याचे काम करत आहे. AGI म्हणजे अशी कृत्रिम बुद्धिमत्ता जी माणसासारखी विचार करू शकते, शिकू शकते आणि नवी कामे समजून घेऊन करू शकते. या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये त्रपित बंसल आता थेट सामील झाला आहे.

त्रपित बंसलचे शैक्षणिक आयुष्य

त्रपित बंसल याने आपल्या करिअरची सुरुवात २०१२ मध्ये गुरुग्राममधील Accenture Management Consulting मध्ये एनालिस्ट म्हणून केली. त्यानंतर त्याने दोन वर्षं IISc बेंगळुरू येथे रिसर्च असिस्टंट म्हणून काम करताना AI क्षेत्रातील सखोल अभ्यास सुरू केला.

पुढे त्याने Facebook, Google, Microsoft आणि OpenAI यांसारख्या जगप्रसिद्ध टेक कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करत महत्त्वाचा अनुभव घेतला, विशेषतः Natural Language Processing (NLP) प्रकल्पांवर काम केले. शेवटी, 2022 मध्ये तो OpenAI मध्ये फुलटाइम टेक्निकल स्टाफ म्हणून नियुक्त झाला. आणि आता Meta च्या AGI प्रकल्पासाठी त्याची निवड झाली आहे.

FAQs

  1. त्रपित बंसल कोण आहेत? (Who is Tripit Bansal?)
    त्रपित बंसल हे IIT कानपूरचे माजी विद्यार्थी असून, AI क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय टेक कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

  2. AGI म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का आहे? (What is AGI and why is it important?)
    AGI म्हणजे Artificial General Intelligence — ही अशी बुद्धिमत्ता आहे जी माणसासारखी विचार करू शकते, शिकू शकते आणि विविध कामं आत्मसात करू शकते. हे भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

  3. त्रपित बंसलला मोठं पॅकेज देणारी कंपनी कोणती आहे? (Which company hired Tripit Bansal with a massive package?)
    त्रपित बंसल यांना Meta (Facebook ची पेरेंट कंपनी) ने 854 कोटी रुपयांच्या पॅकेजसह आपल्या AGI प्रोजेक्टसाठी नियुक्त केलं आहे.

  4. त्रपित बंसल यांचं शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? (What is Tripit Bansal’s educational background?)
    त्यांनी IIT कानपूर येथून गणित आणि सांख्यिकीमध्ये पदवी घेतली असून, University of Massachusetts Amherst येथून कंप्यूटर सायन्समध्ये PhD पूर्ण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT