Fan Speed in Summer eSakal
विज्ञान-तंत्र

Fan Speed : उन्हाळ्यात तुमच्याही फॅनचा स्पीड कमी होतो का? जाणून घ्या कारण, अन् दुरूस्त करायची पद्धत

Summer Tips : अजून मे महिना सुरू झाला नाही, तेवढ्यातच कित्येक ठिकाणी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशामध्ये घरा-घरांमधील पंखे फुल स्पीडने फिरताना दिसत आहेत.

Sudesh

Fan Speed in Summer : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा पारा वाढला आहे. अजून मे महिना सुरू झाला नाही, तेवढ्यातच कित्येक ठिकाणी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशामध्ये घरा-घरांमधील पंखे फुल स्पीडने फिरताना दिसत आहेत. मात्र कित्येकांची अशी तक्रार असते, की घरातील पंखे नेमके उन्हाळ्यातच हळू चालतात. तुमच्याही घरी हीच समस्या असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

उन्हाळ्यात फॅनचा स्पीड कमी होण्याची दोन मुख्य कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे व्होल्टेज. उन्हाळ्यात वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे कित्येक वेळा व्होल्टेज कमी होतं. यामुळे फॅनचा वेगही कमी होतो.

याचं दुसरं कारण म्हणजे, फॅनचा कन्डेन्सर कमकुमवत होणे. हिवाळ्यामध्ये फॅनचा वापर अगदी कमी होत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे फॅनचा कन्डेन्सर वीक किंवा खराब झालेला सहसा लक्षात येत नाही. कन्डेन्सर बदलून नवीन टाकल्यास फॅनचा स्पीड पुन्हा पहिल्यासारखा होईल.

काय करता येईल उपाय?

फॅनचा कन्डेन्सर बदलणे हा मुख्य उपाय आहे. तुम्ही स्वतः देखील मार्केटमधून नवीन कन्डेन्सर घेऊन येऊ शकता, आणि बदलू शकता. अर्थात, तुम्हाला त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगबाबत साधारण माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही एखाद्या मेकॅनिकच्या मदतीने देखील कन्डेन्सर बदलून घेऊ शकता.

याव्यतिरिक्त दुसरा उपाय म्हणजे तुम्ही घराच्या मेन सप्लायमध्ये स्टेबलायझर बसवू शकता. यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या विजेचं व्होल्टेज नियमित होईल, आणि फॅनला योग्य प्रकारे वीजपुरवठा मिळेल. यामुळे फॅनचं स्पीड कमी-जास्त न होता एकसारखं राहील. या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील जर तुमच्या घरातील पंखा नीट काम करत नसेल, तर मेकॅनिकला बोलवून त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT