phone pay and post pay esakal
विज्ञान-तंत्र

'फोन पे' आणि 'पोस्ट पे' मध्ये खडाजंगी, का सुरु आहे वाद जाणून घेऊया

फ्लिपकार्ट ग्रुप कंपनीने शुक्रवारी रात्री दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली.

शिल्पा गुजर

फोनपेच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा गैरवापर पोस्ट पे ने करु नये यासाठी फोनपेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

वॉलमार्ट इंकच्या मालकीचे पेमेंट अॅप्लिकेशन 'फोन पे' ने भारतपेच्या 'बाय नाऊ, पे लेटर' (buy now, pay later) अॅप 'पोस्ट पे' विरोधात ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवा खटला दाखल करायचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याआधीची याचिका मागे घेतली आहे. फोनपेच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा गैरवापर पोस्ट पे ने करु नये यासाठी फोनपेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फ्लिपकार्ट ग्रुप कंपनीने शुक्रवारी रात्री दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली.

रेझिलिएंट इनोव्हेशन्सचा पोस्टपे हा फोनपेच्या चिन्हासारखाच (Trademark) हुबेहुब असल्याचे न्यायालयाच्या निरिक्षणात नोंदवले आहे. फोनेटिकली अर्थात शब्द उच्चारताना आलेला सारखा आवाज, संरचनात्मक (structurally) आणि पाहतानासुद्धा दोन्ही ट्रे़डमार्क्स अगदी सारखीच वाटावी इतके साम्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. ‘PostPe/postpe ही फोनपे या शब्दाची नैसर्गिक उत्क्रांती (natural evolution) आहे आणि ती फोनपेमधूनच निघाल्याचे वाटत असल्याचे न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान नमूद केले.

फोनपेने दाखल केलेल्या विनंतीमध्ये (pleadings) कोर्टाने केलेल्या काही निरीक्षण नोंदवली आहेत, त्यासाठी, फोन पेने आधीचा खटला मागे घेण्यात आल्याचे फोनपेच्या निवेदनात म्हटले आहे. खटला मागे घेण्यास परवानगी देताना आणि दोन्ही पक्षांचे हक्क आणि वाद (contentions) खुले ठेवताना न्यायालयाने फोनपेला नवीन खटला दाखल करण्याचे स्वातंत्र्य दिल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

त्यानुसार, आता नवा खटला दाखल करू आणि 'PostPe'/'postpe च्या ट्रेडमार्क गैरवापराला विरोध करत राहू असे फोन पे ने म्हटले आहे. दुसरीकडे पीटीआयने भारतपेच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता न्यायालयातील शुक्रवारच्या कामकाजावर कोणतेही भाष्य करायचे नाही असे म्हटले.

कायदेशीर प्रक्रियेची प्रतिष्ठा (dignity) टिकवून ठेवण्यासाठी आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेशाची पावती (receipt) मिळण्याची वाट पाहू असे भारतपेच्या प्रवक्त्याने सांगितले. पण पोस्टपेच्या वापराविरूद्ध फोनपेने दाखल केलेला खटला मागे घेतला असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. तर फोनपे आमच्याविरुद्ध करणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाईला आम्ही विरोध करु असेही भारतपेच्या प्रवक्त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT