mark zuckerberg resignation esakal
विज्ञान-तंत्र

Meta CEO : ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणाऱ्या मार्क झुकरबर्गचा फेसबुकचा राजीनामा ?

कंपनीच्या प्रकल्पातील सततच्या अपयशानंतर मोठे बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

नमिता धुरी

मुंबई : मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने अलीकडेच 11,000 लोकांना कामावरून काढून टाकले. या छाटणीबद्दल मार्कने माफीही मागितली असून आता खुद्द मार्क झुकरबर्गने राजीनामा दिल्याची बातमी आहे. (Mark Zuckerberg )

मार्क झुकरबर्ग पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये राजीनामा देऊ शकतात. मार्क झुकेरबर्गच्या राजीनाम्याचे वृत्त मेटा प्रवक्त्याने फेटाळले असले तरी कंपनीच्या प्रकल्पातील सततच्या अपयशानंतर मोठे बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. मेटाचे संपर्क प्रमुख अँडी स्टोन यांनी राजीनाम्याचे वृत्त अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावले.

द लीक नावाच्या वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, मार्क झुकरबर्गने कंपनी सोडली आहे. मार्क झुकेरबर्गने मेटाव्हर्स प्रकल्पावर पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण त्याचे परिणाम दिसत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय कंपनीचे नुकसानही होत आहे. मार्क झुकेरबर्गच्या व्हीआर प्रोजेक्टलाही बाजारातून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला फायनान्शिअल टाईम्सने आपल्या अहवालात म्हटले होते की मेटाचे गुंतवणूकदार आता मार्क झुकरबर्गवर विश्वास ठेवत नाहीत. मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आता दुपटीने कमी झाली आहे. ब्रॅड गेर्स्टनरच्या एका खुल्या पत्रानंतर हे सर्व समोर आले आहे ज्यांच्या फंड अल्टिमीटर कॅपिटलकडे लाखो डॉलर्सचे मेटा शेअर्स आहेत.

असे बोलले जात आहे की मेटाव्हर्ससारखे प्रकल्प अपयशी ठरल्यानंतर आणि गुंतवणूकदार निघून गेल्यानंतर मार्क झुकरबर्ग स्वतःला जबाबदार धरणार आहेत. मेटाव्हर्समुळे मेटाचा स्टॉक 70% पेक्षा जास्त घसरला आहे. असेही म्हटले जात आहे की मार्कचा राजीनामा हा फक्त एक पीआर स्टंट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

Latest Marathi News Live Update : चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक आक्रमक

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात सर्वाधिक विरोध आजरा तालुक्यातून, शेतकऱ्यांनी एकत्र येत हरकती नोंदवल्या

'मिलिंद आणि माझ्यात 21 वर्षांचं अंतर होतं...' मिलिंद सोमणसोबतच्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री म्हणाली, 'आमचं ओपन रिलेशन...'

SCROLL FOR NEXT