Wi-Fi Booster Sakal
विज्ञान-तंत्र

Wi-Fi Booster: स्लो इंटरनेटला वैतागला? हाय-स्पीडसाठी वापरा 'हे' खास डिव्हाइस

तुम्ही जर स्लो इंटरनेट स्पीडला वैतागला असाल तर बाजारात खास डिव्हाइस उपलब्ध आहे. या डिव्हाइसद्वारे हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Wi-Fi ExtenderDevice: अनेक भागांमध्ये मोबाइल नेटवर्कची मोठी समस्या असते. मोबाइल नेटवर्कच नसल्याने कॉलिंगपासून ते इंटरनेट वापरण्यापर्यंत अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी अनेकजण ब्रॉडबँड कनेक्शन घेतात. परंतु, मोठे घर असल्यास सर्वच ठिकाणी वाय-फायची रेंज मिळेल असे नाही. Wi-Fi Network ची रेंज कमी असल्यास अनेकजण जास्त स्पीड असलेला प्लॅन घेतात. मात्र, तुम्ही जास्त किंमतीच्या प्लॅन ऐवजी खास डिव्हाइसचा वापर करू शकता.

तुम्ही हाय-स्पीड इंटरनेटसाठी Wi-Fi Extender चा वापर करू शकता. एकदा डिव्हाइस खरेदी केल्यास तुम्हाला संपूर्ण घरात हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळेल. Wi-Fi Extender या डिव्हाइसविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Wi-Fi Extender काय आहे?

वाय-फाय एक्सटेंडर सहज बाजारात मिळतील. या डिव्हाइसचा आकार खूपच लहान असतो व सहज पॉवर सॉकेटमध्ये प्लगइन करू शकता. एकदा प्लग ऑन केल्यास आपोआप वाय-फायचा स्पीड वाढेल. याद्वारे तुम्हाला घरातील कोणत्याही कोपऱ्यात शानदार इंटरनेट स्पीड मिळेल. बाजारात वेगवेगळे वाय-फाय एक्सटेंडर उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी घेऊ शकता.

हेही वाचा: Royal Enfield: दरमहिना 5 हजार द्या अन् घरी घेऊन जा Royal Enfield Bullet 350, पाहा डिटेल्स

Wi-Fi Extender ची किंमत

Wi-Fi Extender च्या किंमतीबद्दल सांगायचे तर हे डिव्हाइस बाजारात १५०० रुपयांपासून ते ४००० रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही जेवढे चांगले डिव्हाइस घ्याल, तेवढ्या जास्त भागात सिग्नल मिळेल. तुम्हाला फक्त एकदाच या डिव्हाइससाठी पैसे खर्च करावे लागतील, त्यानंतर तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळेल.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT