Winter Car Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

Car Blower Hazard : हीटर किंवा ब्लोअर अधिक काळ चालू ठेवल्यास आजूबाजूचा ऑक्सिजन कमी होत जातो.

Sudesh

Car safety tips for winter : हिवाळ्यामध्ये आपल्या कारच्या आतमधील तापमान उबदार ठेवण्यासाठी कित्येक जण हीटर किंवा ब्लोअरचा वापर करतात. यामुळे काही वेळातच कारच्या आतमधील तापमान वाढतं, आणि बाहेरील थंडीपासून बचाव होतो. मात्र, ब्लोअर वापरताना विशिष्ट काळजी घेणं गरजेचं आहे.

हीटर किंवा ब्लोअर अधिक काळ चालू ठेवल्यास आजूबाजूचा ऑक्सिजन कमी होत जातो. यासोबतच बाजूच्या हवेतील कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड याचा स्तर वाढायला लागतो. यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. या गॅसचं प्रमाण वाढल्यास जीव जाण्याचा धोका असतो.

काच लावणं टाळा

ब्लोअर लावल्यानंतर कार लवकर गरम व्हावी यासाठी लोक काचा पूर्णपणे लावून घेतात. मात्र, यामुळे श्वास गुदमरण्याची भीती वाढते. त्यामुळे ब्लोअर किंवा हीटरचा वापर करत असाल, तर थोड्या-थोड्या वेळाने कारच्या काचा उघडणं योग्य ठरतं. यामुळे कारमध्ये हवा आणि ऑक्सिजन येत राहतो. (Automobile News)

लहान मुलांची काळजी

कित्येक वेळा लोक कारमध्ये लहान मुलांना सोडून आपली इतर कामे करायला जातात. अशा वेळी कारमध्ये ब्लोअर सुरू ठेऊन काचा बंद असल्यास, मोठी दुर्घटना घडू शकते. अशा प्रकारची चूक करणं टाळा.

गाडी चालवताना खबरदारी

गाडी चालवताना जर तुम्ही ब्लोअर वापरत असाल, तर रीसर्क्युलेशन मोड चालू ठेवा. यामुळे कारच्या केबिनमध्ये ताजी हवा येत राहील आणि गुदमरण्याचा धोका टळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT