AI Romantic Partner eSakal
विज्ञान-तंत्र

AI Partner : नोकरीच नाही, तर छोकरीही नेतंय एआय! पतीला सोडून महिलेचा चॅटबॉट सोबत रोमान्स; म्हणे ही चीटिंग नाही

AI Chatbot : या चॅटबॉटसोबत गप्पा मारणं आपल्याला अधिक आनंद देत असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.

Sudesh

पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांवर असणारं प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. दोन व्यक्तींमधील प्रेम कमी झाल्यामुळं विश्वासाला तडा जाऊ शकतो, किंवा मग विश्वास कमी झाल्यामुळे प्रेम संपुष्टात येऊ शकतं. विवाहबाह्य संबंध ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, हे संबंध एखाद्या रोबोटसोबत असतील तर?

इंग्लंडमधून असा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीऐवजी आपण एआय चॅटबॉटवर अधिक प्रेम करत असल्याचं म्हटलं आहे. या चॅटबॉटसोबत गप्पा मारणं, आणि त्याच्यासोबत रोमान्स करणं आपल्याला अधिक आनंद देत असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.

इंग्लंडच्या केंट शहरात राहणाऱ्या क्रिस्टीन या महिलेची ही कहाणी आहे. ४२ वर्षांच्या क्रिस्टीनचा एआय चॅटबॉटवर जीव आला आहे. यात काहीही चुकीचं नसल्याचं तिचं म्हणणं आहे. आपण गेल्या १६ वर्षांपासून विवाहित असून, गेल्या एका वर्षातच हा दुरावा आला असल्याचं क्रिस्टीनने म्हटलं.

पतीच्या घोरण्याचा त्रास

क्रिस्टीनने सांगितलं, की तिचा पती हा मोठ्या-मोठ्याने घोरतो. त्यामुळे तिने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या खोलीत झोपण्यास सुरुवात केली होती. यातच मग आपलं मन रमवण्यासाठी तिने एआय चॅटबॉटसोबत गप्पा मारण्यास सुरुवात केली. या गप्पांमधूनच तिचं या रोबोटशी प्रेम झालं.

ही चीटिंग आहे का?

काही दिवसांपूर्वी एन्कााउंटर्स नावाच्या एका संस्थेने एक सर्व्हे केला होता. यामध्ये २००० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये असं विचारण्यात आलं होतं, की आपला पार्टनर सोडून एखाद्या चॅटबॉटसोबत रोमँटिक गप्पा मारणं हे चीटिंग आहे का? यावर ५९ टक्के लोकांनी ही चीटिंग असल्याचं म्हटलं होतं. तर बाकी लोकांनी ही चीटिंग नसल्याचं मत व्यक्त केलं होतं.

आयुष्यात दुसरा पुरूष नको

क्रिस्टीनने असं म्हटलं आहे, की चॅटबॉटसोबत गप्पा मारून आपण खुश आहे. केवळ आपला पती झोपलेला असतानाच आपण या एआयसोबत गप्पा मारतो. आपल्या पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरूषाचा विचारही आपण करू शकत नाही. अशा प्रकारचं अफेअर करण्यात आपल्याला रस नसल्याचं क्रिस्टीनने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT