X CEO Linda eSakal
विज्ञान-तंत्र

X CEO Linda : सीईओंच्याच होम स्क्रीनवर नाही 'एक्स' अ‍ॅप; लिंडा याक्कारिनो होतायत ट्रोल

Linda Yaccarino Home Screen : लिंडा याक्कारिनो यांची याच वर्षी मे महिन्यात एक्सच्या सीईओ पदी निवड झाली होती.

Sudesh

इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून एक्स (ट्विटर) अ‍ॅप कायम चर्चेत किंवा वादात राहिलं आहे. कामगार कपात, नाव आणि लोगो बदल, सबस्क्रिप्शन प्लॅन अशा कित्येक गोष्टींमुळे एक्स मोठ्या प्रमाणात ट्रोल झालं आहे. हे अ‍ॅप आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय, मात्र यावेळी इलॉन मस्क नव्हे,, तर कंपनीच्या सीईओ लिंडा याक्कारिनो याला कारणीभूत आहेत.

लिंडा याक्कारिनो यांची याच वर्षी मे महिन्यात एक्सच्या सीईओ पदी निवड झाली होती. मस्क यांनी विकत घेतल्यानंतर कित्येक जाहिरातदारांनी ट्विटरवरुन काढता पाय घेतला होता. यानंतर जाहिरातदारांना परत आणण्यासाठी आणि यूजर्सची संख्या वाढवण्यासाठी लिंडा यांना पाचारण करण्यात आलं होतं.

नेमकं काय घडलं?

वॉक्स मीडियाने आयोजित केलेल्या कोड 2023 या कार्यक्रमात लिंडा याक्कारिनो उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी समोर असलेल्या लोकांना आपल्या आयफोनची होम स्क्रीन दाखवली. यावेळी त्यांच्या होम स्क्रीनवर चक्क एक्स अ‍ॅपच दिसलं नाही.

विशेष म्हणजे, लिंडा यांच्या फोनच्या होम स्क्रीनवर मेटाचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे अ‍ॅप्स देखील होते. सोबत स्टारबक्स, जीमेल, सिग्नल, अ‍ॅपल मेसेज, फेसटाईम असे अ‍ॅप्सही दिसले. मात्र, ज्या कंपनीसाठी त्या काम करतात, ते एक्स अ‍ॅपच होम स्क्रीनवर नसल्यामुळे लिंडा या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT