X Audio Calling eSakal
विज्ञान-तंत्र

X Audio Calling : 'एक्स'वर ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच, इलॉन मस्कने पोस्ट करत दिली माहिती; अशी करा सेटिंग

हे या फीचरचं सुरुवातीचं व्हर्जन असल्याचं मस्कने एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sudesh

'एक्स' म्हणजेच ट्विटर अ‍ॅपला 'एव्हरिथिंग अ‍ॅप' बनवण्याचा इलॉन मस्क यांचा प्रयत्न आहे. यासाठीच आता या अ‍ॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे या फीचरचं सुरुवातीचं व्हर्जन असल्याचं मस्कने एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

डोग डिझायनर या एक्स हँडलवरुन या व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग फीचरचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सेटिंग्स देखील दिसत आहेत. तुम्हाला कोणत्या यूजर्सकडून कॉल्स हवे आहेत याची निवड देखील तुम्ही करू शकता, असं या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. तसंच इलॉन मस्कला केलेला व्हिडिओ कॉलदेखील एका पोस्टमध्ये दिसत आहे.

कुणाला मिळणार फीचर?

हे फीचर सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून, केवळ काही यूजर्सना याचा अ‍ॅक्सेस मिळाला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर यूजर्सना देखील हे फीचर उपलब्ध होईल. अर्थात, हे केवळ ब्लू टिक असणाऱ्या सबस्क्राईब्ड यूजर्सना मिळणार आहे, की सर्वच यूजर्सना मिळेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. (Elon Musk)

अशी करा सेटिंग

हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सना सर्वात आधी सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर डायरेक्ट मेसेज हा पर्याय निवडून, 'इनेबल ऑडिओ अँड व्हिडिओ कॉलिंग' हा ऑप्शन ऑन करावा लागेल. यानंतर खाली असलेल्या पर्यायांच्या मदतीने तुम्ही आपल्याला येणाऱ्या कॉल्सवर निर्बंध लागू करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT