X Stopped Working eSakal
विज्ञान-तंत्र

X Down : एक्सची सेवा ठप्प? भारतासह कित्येक देशांमध्ये आउटेज, यूजर्सच्या तक्रारी

आज सकाळी 10.45 ते 11 च्या दरम्यान एक्सची सेवा ठप्प झाल्याचं दिसून आलं. या काळात कित्येक यूजर्सनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला.

Sudesh

X Stopped Working : इलॉन मस्कचं 'एक्स' हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात काही काळासाठी बंद पडलं होतं. आज सकाळी 10.45 ते 11 च्या दरम्यान एक्सची सेवा ठप्प झाल्याचं दिसून आलं. या काळात कित्येक यूजर्सनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला. डाऊनटाईमच्या काळात यूजर्सना पोस्ट करणे, किंवा एखादं पेज ओपन करणे अशा गोष्टींसाठी देखील अडचण येत होती.

भारतातील दिल्ली, जयपूर, लखनऊ, कटक, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि इतर बऱ्याच शहरांमध्ये सुरुवातीला ही अडचण दिसून आली. कित्येक यूजर्सना लॉग-इन करण्यास देखील अडचण येत होती. डाऊनडिटेक्टर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास भारतातील सुमारे 500 यूजर्सनी याबाबत तक्रार केली होती.

Downdetector Screenshot

मेटाच्या अ‍ॅप्सनंतर आता इलॉनची वेळ

काही दिवसांपूर्वीच मेटाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया हँडल्स अशाच प्रकारे डाऊन झाले होते. जगभरातील यूजर्सना लॉगइन करण्यास अडचण येत होती. यावेळी इलॉनने मीमच्या माध्यमातून मेटाला ट्रोल केलं होतं. तसंच कित्येक यूजर्सनी एक्सवर तक्रारी केल्या होत्या. मात्र, आता एक्सच डाऊन झाल्यामुळे यूजर्सनी इलॉन मस्कला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, काही मिनिटांमध्येच एक्सची सेवा पूर्ववत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT