X to Charge for Live Streaming esakal
विज्ञान-तंत्र

X Update : एक्स कंपनीने आणखी एका मोफत फीचरवर फिरवली तलवार; फक्त 'या' युजर्ससाठी सुरु राहणार सुविधा,जाणून घ्या

Live Streaming Charge : एलॉन मस्कच्या X Platform वर (पूर्वीचे ट्विटर) आणखी एका मोफत फीचरवर तलवार फिरली आहे. X वर फक्त प्रीमियम युजर्स लाईव्ह स्ट्रीम करू शकणार आहेत.

Saisimran Ghashi

X Premium : एलॉन मस्कच्या X Platform वर (पूर्वीचे ट्विटर) आणखी एका मोफत फीचरवर तलवार फिरली आहे. आणखीन एक धक्कादायक निर्णय घेत लवकरच X वर फक्त प्रीमियम युजर्सच लाईव्ह स्ट्रीम करू शकणार आहेत अशी घोषणा केली आहे. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्हाला तुमच्या फॉलोअर्ससोबत लाईव्ह स्ट्रीम करायची असेल तर तुम्हाला X चं प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.

आत्तापर्यंत X वर विनामूल्य लाईव्ह स्ट्रीम करता येत होती. पण आता कंपनी फक्त पैसे देणाऱ्या युजर्सनाच ही सुविधा देणार आहे. या निर्णयामुळे X ही सोशल मीडियाची एकमेव अशी प्लॅटफॉर्म ठरेल जिथं लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. कारण, सध्या Instagram, YouTube आणि Facebook या सर्वच प्लॅटफॉर्म्सवर विनामूल्य लाईव्ह स्ट्रीम करता येते.

X ने नुकतंच एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "लवकरच फक्त Premium सबस्क्रिप्शन घेतलेले यूजर्सच Live Stream करू शकतील. त्यात X सह integretion असलेल्या encoder द्वारे Live करणे देखील समाविष्ट आहे."

हे नवीन नियम लागू करण्याची तारीख अजून समोर आली नसली तरी X ची ही एकमेव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल जी Live Stream करण्यासाठी पैसे आकारेल. या निर्णयामुळे अनेक X यूजर्स नाराज होण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत X वर कोणत्याही अडथळ्याशिवाय Live करता येत होते.

याआधी देखील एलॉन मस्क यांनी सांगितलं होतं की X नवीन यूजर्सना पोस्ट करण्यासाठी $1 ची वार्षिक फी आकारणार आहे. या फीमध्ये बुकमार्क करणे, उत्तर देणे किंवा पोस्ट Like करणे हे बेसिक फीचर्स देखील समाविष्ट असतील. त्यामुळे X वर आता फ्री मध्ये काहीच राहणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT