X Accounts Ban eSakal
विज्ञान-तंत्र

X Accounts Ban : 'एक्स'चा भारतीय यूजर्सना दणका! देशातील सुमारे 24 लाख अकाउंट्स केले बंद; काय आहे कारण?

या कारवाईत चाईल्ड पॉर्नोग्राफी, न्यूड कंटेंट आणि दहशतवाद पसरवणारे अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत.

Sudesh

Twitter Accounts Ban : इलॉन मस्कच्या 'एक्स' (ट्विटर) या मायक्रो-ब्लॉगिंग साईटने भारतातील सुमारे 24 लाख अकाउंट्स बंद केले आहेत. जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी, न्यूड कंटेंट आणि दहशतवाद पसरवणारे अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 मे ते 25 जून या कालावधीमध्ये कंपनीने भारतातील 5,44,473 अकाउंट्सवर निर्बंध लागू केले होते. जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये एकूण 23,95,495 एक्स खाती बंद करण्यात आली आहेत.

दहशतवाद विरोधी कारवाई

मे ते जून या कालावधीमध्ये एक्स कंपनीने दहशतवादी कंटेंट पसरवणाऱ्या 1,772 अकाउंट्सना साईटवरुन हटवलं. तर, जून ते जुलै दरम्यान अशाच 2,865 अकाउंट्सना हटवण्यात आलं. दहशतवादासंबंधी कंटेंट पसरवणाऱ्या सुमारे 18,51,022 अकाउंट्सवर निर्बंध लागू करण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

ग्राहकांच्या तक्रारी

एक्स कंपनीला 26 जून ते 25 जुलैदरम्यान भारतीय ग्राहकांकडून 2,056 तक्रारी प्राप्त झाल्या. यानंतर कंपनीने 49 तक्रारींवर कारवाई केली आहे. यात एका रिपोर्ट केल्या गेलेल्या अकाउंटचं सस्पेन्शन रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, इतर अकाउंट्सवरील बंदी कायम ठेवण्यात आली.

भारतातून सर्वाधिक तक्रारी आक्षेपार्ह मेसेज करणे, आक्षेपार्ह व्यवहार करणे, गोपनीयतेचे उल्लंघन करणे आणि बाल लैंगिक शोषण यासंबंधी होत्या असंही एक्सने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT