Redmi Mobile Offer eSakal
विज्ञान-तंत्र

Redmi Mobile Offer : निम्म्या किंमतीला मिळतायत रेडमीचे स्मार्टफोन; श्याओमीच्या बर्थडेनिमित्त खास ऑफर!

६ जुलै ते १० जुलैपर्यंत हा सेल सुरू असणार आहे.

Sudesh

श्याओमी या चिनी मोबाईल कंपनीचे भारतात असंख्य चाहते आहेत. या कंपनीने आपल्या भारतातील नवव्या वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर दिली आहे. यामध्ये रेडमीच्या तीन मोठ्या स्मार्टफोनवर तगडा डिस्काऊंट दिला जात आहे. ६ जुलै ते १० जुलैपर्यंत हा सेल सुरू असणार आहे.

Redmi 12C

रेडमीच्या या स्मार्टफोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. मात्र, श्याओमीच्या या सेलमध्ये हा फोन केवळ ७,८९९ रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच चेकआऊट करताना अतिरिक्त ६०० रुपयांची सूटही दिली जात आहे.

या फोनमध्ये ६.७१ इंच मोठा एचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळतो. तसेच, यात ५० मेगापिक्सल क्षमतेचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोअरेज असा पर्याय उपलब्ध आहे.

Redmi Note 12 5G

रेडमीच्या नोट १२ ५जी या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ १४,९९९ रुपयांना मिळतोय. यासोबतच, जुना फोन एक्सचेंज केल्यास यात आणखी २ हजार रुपयांची सूट तुम्हाला मिळू शकते.

यामध्ये ६.६७ इंच डिस्प्ले, १२०० निट्स ब्राईटनेस, गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन, असे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, यात ऑक्टा कोअर डायमेंसिटी १०८० हा तगडा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ५००० mAH बॅटरी, ६७W फास्ट चार्जिंग आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

रेडमीचा Note 12 Pro 5G या स्मार्टफोनवरही मोठा डिस्काउंट दिला जातोय. २७,९९९ रुपयांना असलेला हा मोबाईल, सेलमध्ये केवळ २०,४९९ रुपयांना मिळतोय. एक्सचेंज बोनस म्हणून ही सूट देण्यात येत आहे. श्याओमीच्या अधिकृत वेबसाईटवर हा सेल सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT