Yamaha Concept Bike eSakal
विज्ञान-तंत्र

Yamaha Concept Bike : हँडलची गरजच नाही, केवळ इशाऱ्यांनी चालते यामाहाची नवी बाईक; पाहा व्हिडिओ

मशीन आणि मानवामध्ये एक वेगळं आणि खास नातं तयार करण्यासाठी ही बाईक महत्त्वाची ठरेल, असं कंपनीने म्हटलं आहे.

Sudesh

Yamaha Motoroid 2 : जपानी बाईक कंपनी यामाहा ही आपल्या खास गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आकर्षक लुक आणि डिझाईन असणाऱ्या यामाहाच्या गाड्या भारतात देखील लोकप्रिय आहेत. आता यामाहाने आपली एक नवी कन्सेप्ट बाईक लाँच केली आहे. विशेष म्हणजे या बाईकला हँडलच नाहीत. मोटोरॉईड 2 असं या कन्सेप्ट बाईकचं नाव आहे.

या बाईकचं डिझाईन अगदी एखाद्या सायन्स-फिक्शन (Science-fiction) मूव्हीमध्ये दिसणाऱ्या बाईक्सप्रमाणे आहे. अगदी युनिक लुक आणि टेक्नॉलॉजी (Technology) वापरण्यात आलेल्या या बाईकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ट्विस्टिंग स्विंगआर्म, एआय फेशिअल रेकग्नेशन, सेल्फ बॅलन्सिंग आणि जेश्चर कंट्रोल अशी टेक्नॉलॉजी यामध्ये वापरण्यात आली आहे.

हँडलशिवाय कशी वळणार?

व्हिडिओमध्ये दिसतंय की बाईकला हँडलच्या जागी केवळ ग्रिप बार दिल्या आहेत. ही बाईक चालवणारी तरुणी तर दोन्ही हात सोडूनच बाईक ऑपरेट करत आहे. ज्या दिशेला वळायचं आहे, त्या दिशेला थोडंसं झुकून ही बाईक वळवण्यात येत आहे. तसंच हाताच्या इशाऱ्यांनी ही बाईक मागे-पुढे ढकलणे किंवा थांबवणे अशा क्रिया केल्या जात आहेत. (How to turn without a handle?)

या बाईकमध्ये असलेल्या फेशिअल रेकग्नेशन तंत्रज्ञानामुळे (Yamaha Bike Facial Recognition Tech) ही बाईक आपल्या मालकाला ओळखू शकते. मालकाचा चेहरा स्कॅन करताच यातील फीचर्स अ‍ॅक्टिव्हेट होतात. सोबतच सेल्फ बॅलन्सिंग टेक्नॉलॉजीमुळे (Self Balancing Technology) ही बाईक आपोआप चालत आपल्या मालकाकडे येऊ शकते, तसंच तिला उभं करण्यासाठी स्टँडचीही गरज भासत नाही.

MOTOROiD बाईकचं पहिलं व्हर्जन यामाहाने 2017 साली सादर केलं होतं. आता याचं दुसरं व्हर्जन समोर आणण्यात आलं आहे. मशीन आणि मानवामध्ये एक वेगळं आणि खास नातं तयार करण्यासाठी ही बाईक महत्त्वाची ठरेल, असं कंपनीने म्हटलं आहे. एखादा पेट ज्याप्रमाणे आपल्या मालकासोबत शेजारी चालतो, तसंच ही बाईक देखील मालकासोबत चालू शकणार आहे.

ही एक कन्सेप्ट बाईक असून, ही खरोखरच लाँच केली जाईल का याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, कन्सेप्ट बाईक तयार झाल्यामुळे भविष्यातील बाईक्स कशा असतील याची एक झलक यामाहाने नक्कीच आपल्याला दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT