Yamaha MT-15 sakal
विज्ञान-तंत्र

Yamaha ची नवीन स्टायलिश बाईक MT-15 भारतात आज होणार लॉन्च

यामाहा मोटर इंडिया (Yamaha Motors India) आपल्या शक्तिशाली मोटरसायकल MT15 ची नवीन आवृत्ती लवकरच बाजारात आणणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

यामाहा मोटर इंडिया (Yamaha Motors India) आपल्या शक्तिशाली मोटरसायकल MT15 ची नवीन आवृत्ती लवकरच बाजारात आणणार आहे. स्टायलिश दिसणार्‍या V2.0 बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील एका डीलरशिपने Yamaha MT15 V2.0 चा फोटो प्रसिद्ध करून बुकिंग सुरू केल्याची माहिती दिली आहे. MT15 ही प्रत्यक्षात Yamaha YZF-R15 V4 ची स्ट्रीट नेकेड आवृत्ती आहे, जिचे इंजिन आणि प्लॅटफॉर्म देखील त्यावर आधारित आहेत. ही बाईक येत्या काही आठवड्यांत लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने मागील मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.46 लाख रुपये ठेवली होती. परंतु नवीन बाईकच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. (Yamaha MT-15 will be launched in India on April 11)

या बाईकशी असेल स्पर्धा-

भारतीय बाजारपेठेत, नवीन Yamaha MT15 ची स्पर्धा TVS Apache RTR 200 4V, Bajaj Pulsar NS 200 आणि KTM Duke 200 यांसारख्या बाइक्सशी होईल. या सर्व बाइक्स इंजिनच्या दृष्टीने दमदार आहेत, पण किमतीच्या बाबतीत ही बाईक त्यांच्याशी स्पर्धा करेल हे नक्की . तुम्हाला यामध्ये स्वारस्य असल्यास, तुम्ही नवीन Yamaha MT15 V2.0 5,000 ते रु. 10,000 च्या टोकनसह बुक करू शकता. कंपनी अनेक मोठ्या बदलांसह या मोटरसायकलची नवीन आवृत्ती लॉन्च करणार आहे.

नवीन बाईक किती वेगळी असेल?-

नवीन MT15 जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन रंगांमध्ये सादर केली जाईल. यामध्ये मोठा बदल बाईकच्या सस्पेन्शन सेटअपमध्ये होणार आहे, येथे जुन्या मॉडेलमध्ये मिळणाऱ्या गोल्डन फॉर्क्सऐवजी कंपनी नवीन फॉर्क्स देणार आहे. यामाहा YZF-R15 V4 च्या धर्तीवर नवीन बाईकमध्ये क्विक शिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोल देखील दिले जाऊ शकते. बाईकला पूर्वीसारखेच 155 cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल जे 10,000 rpm वर 18.1 bhp पॉवर आणि 7,500 rpm वर 14.2 Nm पीक टॉर्क बनवते. हे इंजिन यामाहाच्या VVA तंत्रज्ञानासह 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT