5G Smartphones Launched in 2021 : भारतात 5G नेटवर्कची (5G Network) अद्याप टेस्टींग सुरु आहे आणि ती मे 2022 पर्यंत चालेल. दरम्यान भारतात 5G च्या कमर्शियल लॉन्चबद्दल कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही, परंतु स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात लॉंच करणे सुरु केले आहे. आज आपण मावळत्या वर्षात लॉच झालेल्या 5G स्मार्टफोन्सबद्दल माहिती घेऊया...
आता Xiaomi, Realme, Motorola आणि Vivo सारख्या कंपन्यांनी आता 4G फोन लाँच करणे बंद केले असून 5G स्मार्टफोन्सच्या या स्पर्धेत देशांतर्गत कंपन्याही यामध्ये उतरल्या आहेत. Lava ने नुकताच आपला पहिला 5G फोन Lava Agni 5G लाँच केला. 24 फेब्रुवारी 2020 रोजी, पहिला 5G स्मार्टफोन Realme X50 Pro भारतात लॉन्च करण्यात आला. Realme X50 Pro भारतात 44,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला.
Xiaomi
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात Xiaomi आपला एखादा खास स्मार्टफोन लॉन्च करत आलेली आहे. 5 जानेवारी 2021 रोजी देखील Xiaomi India ने भारतात 2021 Mi 10i चा पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. 2021 साली भारतात लॉन्च होणारा हा पहिला 5G स्मार्टफोन लॉंच केला होता. तसेच Mi 10i हा भारतात लाँच होणारा पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा Samsung HM2 सेन्सर देण्यात आला आहे. पुढल वर्षी 2022 च्या पहिल्या आठवड्यात देखील Xiaomi भारतातील सर्वात फास्ट चार्जिंग स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
realme 5g फोन
Realme X7 आणि Realme X7 Pro भारतात मार्च 2021 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. Realme X7 Pro आणि Realme X7 या दोन्ही फोनमध्ये 5G साठी सपोर्ट देण्यात आला आहे. Realme X7 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये Octacore Dimensity 800U प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. 2021 मध्ये लॉन्च होणारे हे Realme चे पहिले 5G फोन होते आणि त्यानंतर भारतात Realme चे 10 पेक्षा जास्त 5G फोन लॉन्च झाले आहेत.
Vivo चा 2021चा पहिला 5G फोन
Vivo India ने मार्च 2021 मध्ये Vivo X60 सीरीज भारतात लाँच केली. Vivo X60 अंतर्गत तीन फोन लॉन्च केले गेले ज्यात Vivo X60 Pro +, Vivo X60 Pro आणि Vivo X60 यांचा समावेश आहे. यापैकी Vivo X60 आणि Vivo X60 Pro हे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लॉन्च झाले होते. Vivo X60 सीरीजच्या तिन्ही फोनमध्ये 5G सपोर्ट देण्यात आला आहे.
Lava Agni 5G
भारतीय मोबाईल निर्माता कंपनी Lava ने यावर्षी आपला पहिला 5G फोन लॉन्च केला आहे. 5G फोन लॉन्च करणारी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. मायक्रोमॅक्सने आतापर्यंत 5G फोन लॉन्च करण्याबाबत काहीही माहिती दिलेली नाहाये. Lava Agni 5G मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा डिस्प्ले दिला असून फोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसर, 8 GB पर्यंत RAM आणि 5000mAh बॅटरी मिळते. फोनमध्ये चार रियर कॅमेरे देखील आहेत. Lava Agni 5G ची किंमत 19,999 रुपये आहे.
iqoo, oneplus आणि samsung
Realme, Xiaomi, Vivo व्यतिरिक्त iQoo आणि OnePlus या कंपन्यांनी देखील अनेक 5G फोन देखील भारतात लॉन्च केले आहेत. याशिवाय सॅमसंगचे अनेक फ्लॅगशिप आणि मिडरेंज 5G फोन देखील भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. 5G फोनच्या यादीमध्ये iQOO 7, iQOO Z3, POCO M3 Pro 5G, OnePlus 9R, OnePlus Nord, Samsung Galaxy S20 FE 5G, Motorola Edge 20 Fusion, iPhone 12 Series, iPhone 13 Series, Vivo Y73 सारख्या अनेक फोनचा समावेश आहे.
भारतात 5G कधी सुरू होईल?
भारतात 5G नेटवर्क लॉन्च करण्याबाबत सध्या काहीही माहिती उपलब्ध नाही. ट्रायलसाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम देण्यात आले आहे. पहिली चाचणी या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपली आणि आता चाचणी मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio युद्धपातळीवर 5G नेटवर्कसाठी प्रयत्न करत आहेत, परंतु ते सर्वसामान्यांसाठी ते कधी उपलब्ध केले जातील याबद्दल सध्या कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. 5G लाँच करण्यासाठी सरकारने अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.