Tiktok Sakal
विज्ञान-तंत्र

TikTok चा जगभरात डंका! लोकप्रियतेत गुगल-ॲपलही पडले मागे, पाहा यादी

सकाळ डिजिटल टीम

शॉर्ट-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म TikTok ने 2021 च्या अखेरीस गुगल (Google) ला मागे टाकत सर्वात लोकप्रिय डोमेन(Most Popular Domain) बनले आहे. वेब सिक्युरिटी कंपनी क्लाउडफ्लेअर (Cloudflare) ने एका वर्षाच्या डेटाच्या आधारे एक यादी तयार केली आहे. त्यानुसार गुगलसह जगातील 9 दिग्गज कंपन्या टिकटॉकच्या मागे पडल्या आहेत. 2020 मध्ये फेसबुक नंतर गुगल हे सर्वात लोकप्रिय डोमेन ठरले होते, तर टिकटॉक त्या वर्षी 7 व्या क्रमांकावर होते. (Tiktok beats google became most popular website in 2021)

गेल्या वर्षी भारतात टिक टॉकसह अनेक चिनी अॅप्सवर सुरक्षेचे कारण देत बंदी घालण्यात आली होती. सरकारच्या बंदीनंतर गुगलने टिक टॉकसह सर्व बंदी घातलेले अॅप प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. अॅपल स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध नाही. तरीही भारतातील बरेच लोक या अॅप वापरत आहेत.

अनेक मोठ्या कंपन्या पडल्या मागे

क्लाउडफ्लेअरच्या रिपोर्टनुसार, 17 फेब्रुवारी 2021 रोजी टिकटॉक एका दिवसासाठी टॉपवर आले. त्याचप्रमाणे, मार्च आणि मे मध्ये, टिकटॉक आणखी काही दिवस टॉपवर राहिले, परंतु 10 ऑगस्ट 2021 नंतर, टिकटॉक मुसंडा मारली. यादरम्यान, असे काही दिवस होते जेव्हा गुगल पहिल्या क्रमांकावर राहिले. ऑक्‍टोबर आणि नोव्‍हेंबरमध्‍ये बहुतांश दिवस टिकटॉक अव्वल स्थानी राहिले.

WhatsApp 10 व्या क्रमांकावर

सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग सेवा अॅप व्हॉट्सअॅप या यादीत 10 व्या क्रमांकावर पोहोचले आहे, तर ट्विटर 9 व्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, OTT प्लॅटफॉर्म Netflix आणि व्हिडिओ शेअरिंग अॅप Youtube या यादीत 7 आणि 8 व्या क्रमांकावर आहे.

भारतात बंदी घातलेला टिकटॉक भारतात प्रचंड लोकप्रिय झाले होते. बंदी घालण्याच्या आधी टिकटॉकचे भारतात 1 अब्ज मंथली सक्रिय वापरकर्ते होते. अमेरिका, युरोप, ब्राझील आणि दक्षिण पुर्व आशियाई देश अजूनही या शॉर्ट व्हिडिओ अॅपसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहेत. टिक टॉकची मालकी चीनच्या बाइटडान्स कंपनीकडे आहे.

2021 अखेर सर्वाधिक लोकप्रिय टॉप 10 डोमेन

1 TikTok.com

2 Google.com

3 Facebook.com

4 Microsoft.com

5 Apple.com

6 Amazon.com

7 Netflix.com

8 YouTube.com

9 Twitter.com

10 WhatsApp.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला तळणीचे की उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे? वाचा पद्म पुराणात काय सांगितले

Crime News : नाशिक रोडला दरोड्याची तयारी करणाऱ्या पाच संशयितांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT