Cars That Were Discontinued In 2021
Cars That Were Discontinued In 2021 Google
विज्ञान-तंत्र

2021 मध्ये बंद झाल्या या लोकप्रिय कार; जाणून घ्या संपूर्ण यादी

सकाळ डिजिटल टीम

Cars That Were Discontinued In 2021 : 2021 हे वर्ष सर्वाच उद्योगांसाठी कठीण वर्ष होते. कोरोनाची (Corona) दुसरी लाट आणि सेमीकंडक्टरच्या तुटवडा यापासून वर्षभरात घसरलेली वाहानांची विक्री असे अनेक धक्के या वर्षी वाहन उद्योगाला (Automobile Sector) बसले. त्या व्यतिरिक्त 2021 मध्ये विविध कारणांमुळे अनेक लोकप्रिय कार देखील बंद (Cars Discontinued In 2021) करण्यात आल्या. त्यांपैकी काही कार बाजारातून बाहेर पडणे हे धक्कादायक होते, तर काही कार या लवकरच बाजारातून बाहेर पडतील अशी अपेक्षा होती. वर्ष संपत असताना, 2021 मध्ये बंद झालेल्या काही लोकप्रिय कार्सवर आज आपण एक नजर टाकूया.

फोर्ड एंडेव्हर (Ford Endeavour)

2021 मधील प्रमुख घटनांपैकी एक म्हणजे भारतातील वाहन उत्पादन बंद करण्याचा फोर्डचा निर्णय. कंपनीने आपले दोन्ही प्लांट बंद केले आहेत. कंपनी आता त्याऐवजी मस्टंग, मस्टंग मॅच-ई आणि रेंजर सारख्या काही प्रीमियम जागतिक उत्पादनांची (premium global products) इंपोर्ट करेल अशी माहिती देण्यात आली. याचा अर्थ सर्व सध्या उपसब्ध असलेली फोर्ड मॉडेल्स, ज्यामध्ये एन्डेव्हरचा देखील समावेश होतो ते बंद करण्यात आले. एन्डेव्हर फुल साइझ 7-सीटर SUV स्पेस ही अत्यंत लोकप्रिय कार होती, त्यामध्ये स्टॅंडर्ड 10-स्पीड AT सह 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले होते.

फोर्ड इकोस्पोर्ट (Ford EcoSport)

यावर्षात बहुचर्चित फोर्ड इकोस्पोर्टचा देखील निरोप घ्यावा लागला . ही SUV होती ज्याने भारतात सबकॉम्पॅक्ट SUV चा ट्रेंड सुरू केला आणि जवळपास 9 वर्षे जनरेशन अपग्रेड न मिळाल्यानंतरही ती ट्रेंडमध्ये होती. पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय ऑफर करणार्‍या काही सब-4-मीटर SUV पैकी EcoSport देखील होती.

फोर्ड फिगो/फ्रीस्टाइल/एस्पायर (Ford Figo/Freestyle/Aspire)

फोर्डने देशातील कार उत्पादन बंद केले तेव्हा त्यांचे एंट्री-लेव्हल मॉडेल्स तसेच फिगो , फ्रीस्टाइल आणि अस्पायर सारख्या मॉडेल्सचा शेवट झाला. सर्व 3 कार एकाच फिगो फॅमिलीचा भाग होत्या, त्यांनी एकाच प्लॅटफॉर्मवर आणि पेट्रोल-डिझेल इंजिन ऑप्शन देखील शेअर केले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच फोर्ड इंडियाने फिगो हॅचबॅकची 1.2-लीटर ऑटोमॅटिक आवृत्ती भारतात लॉन्च केली होती. तसेच सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीने भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एस्पायर सबकॉम्पॅक्ट सेडान आणि फ्रीस्टाइल क्रॉस-हॅच या दोन्ही फिगो कॉम्पॅक्ट हॅचवर आधारित होत्या आणि त्यात 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन होते.

स्कोडा रॅपिड (Skoda Rapid)

कार भारतात लॉन्च झाल्यानंतर सुमारे एक दशकानंतर या वर्षी स्कोडाने देखील रॅपिड सेडानचे उत्पादन बंद केले. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक होती. . Skoda ने पुढे जात अलीकडेच MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित स्कोडा स्लाव्हिया सादर केली आहे . कंपनीने रॅपिडची खास मॅट एडिशन लॉन्च केली, जी भारतात विकली जाणारी रॅपिड सेडानची शेवटची लॉट होती. रॅपिड ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्यायांसह 1.0-TSI इंजिनसह येत असे.

टोयोटा यारिस (Toyota Yaris)

या वर्षी भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडलेली आणखी एक कॉम्पॅक्ट सेडान म्हणजे टोयोटा यारिस. ही सेडान भारतात 3 वर्षांपेक्षा जास्त काळ बाजारात राहिल्यानंतर बंद करण्यात आली. दुर्दैवाने Yaris भारतीय कार खरेदीदारांवर कायमस्वरूपी छाप पाडण्यात अयशस्वी ठरली आणि विक्रीत घट झाल्याने कंपनीने आता हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला. यारिस सेडानला मारुती सुझुकी सियाझच्या टोयोटा-बॅज्ड आवृत्तीने रिप्लेस केले जाण्याची अपेक्षा आहे, ज्याला टोयोटा बेल्टा म्हटले जाण्याची शक्यता आहे.

फोक्सवॅगन टी-रॉक (Volkswagen T-Roc)

Skoda च्या सिस्टर ब्रँड, Volkswagen India ने देखील त्यांची T-Roc कॉम्पॅक्ट SUV बंद करण्याचा निर्णय घेतला . कंपनीकडे एकही 20 लाखांखालील SUV नाही हे लक्षात घेऊन, कंपनीने T-Roc हे पूर्णपणे बिल्ट युनिट (CBU) मॉडेल म्हणून आणले. आता ते बाजारात आल्यानंतर कंपनीने T-Roc बंद करण्याचा निर्णय घेतला. या SUV ला 1.5-लीटर TSI इंजिन दिले गेले होते, जे DSG ऑटोमॅटिकशी जोडलेले होते.

फोक्सवॅगन टिगुआन ऑलस्पेस (Volkswagen Tiguan Allspace)

T-Roc प्रमाणेच, Tiguan Allspace सुद्धा या वर्षी बंद करण्यात आले आणि त्याची जागा एका 5-सीटर गाडीने घेतलीय. सीबीयू मॉडेल म्हणून भारतात लॉंच झालेल्या ऑलस्पेस पेक्षा टिगुआन फेसलिफ्टने CKD मार्ग स्वीकारत भारतात असेम्बल करण्यात आली. टिगुआन ऑलस्पेस ही 7-सीटर SUC होती आणि स्कोडा कोडियाकची थेट प्रतिस्पर्धी होती, जी जानेवारी 2022 मध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ऑलस्पेस 2.0-लिटर TSI इंजिन हे डीएसजी ऑटोमॅटिकशी जोडलेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT