year end special sale flipkart offers on premium smartphone check here details
year end special sale flipkart offers on premium smartphone check here details Google
विज्ञान-तंत्र

फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करा प्रीमीयम स्मार्टफोन; मिळतेय खास ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Smartphone Year End : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास संधी आहे, Flipkart चा स्मार्टफोन इयर एंड सेल (Year End Sale) आजपासून म्हणजेच 26 डिसेंबरपासून सुरू झाला आहे, जो 30 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्हाला iPhone 12, iPhone 12 Mini आणि Realme GT Master Edition सारख्या स्मार्टफोन्सवर बंपर डील्स आणि डिस्काउंट मिळतील. यासोबतच या हँडसेटवर एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) आणि नो-कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) देखील देण्यात येणार आहे. आज आपण काही निवडक स्मार्टफोन्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यावर बंपर ऑफर्स दिल्या जातील.

मोटोरोला एज 20 फ्यूजन (MOTOROLA Edge 20 Fusion)

किंमत: 20,999 रुपये

Axis Bank त्यांच्या ग्राहकांना Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक देत आहे. एवढेच नाही तर या फोनवर 4000 रुपयांची विशेष डिस्काऊंट आणि 728 रुपयांचा नो-कॉस्ट ईएमआय मिळणार आहे. Motorola Edge 20 Fusion मध्ये 108-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी आहे. याशिवाय फोनमध्ये एमोलेड डिस्प्ले मिळेल.

realme GT मास्टर एडिशन (realme GT Master Edition)

किंमत: 25,999 रुपये

रियलमीचा जीटी मास्टर एडिशन हा एक बेस्ट स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. यासोबतच 4300 mAh बॅटरी आणि क्वालकॉमचा पॉवरफुल प्रोसेसर सपोर्ट मिळतो. आता यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना फोनच्या खरेदीवर 4000 रुपयांचा डिस्काऊंट आणि Axis बँकेकडून 5 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय स्मार्टफोनवर 4,334 रुपयांची नो-कॉस्ट ईएमआय आणि 15,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जाईल.

आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini)

किंमत: 41,199 रुपये

iPhone 12 Mini वर दरमहा 1,409 रुपयांचा नो-कॉस्ट EMI, Axis बँकेकडून 5% सूट आणि 18,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. या फोनमध्ये 5.4 इंच स्क्रीन आणि 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये A14 बायोनिक चिपसेट उपलब्ध असेल.

आयफोन 12 (iPhone 12)

किंमत: 54,199 रुपये

iPhone 12 च्या खरेदीवर तुम्हाला Axis Bank कडून 5 टक्के कॅशबॅक आणि 11,701 रुपयांचा स्पेशल ऑफ मिळेल. यासोबतच फोनवर 1,853 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआय दिला जाईल. आता फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे. या फोनमध्ये A14 बायोनिक चिपसेट आणि 12 मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये पावरफूल बॅटरी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action: ग्राहक चिंतेत! येस बँक आणि ICICI बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

Latest Marathi Live News Update : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबलचक लांब रांगा

Shahid Kapoor And Mira Rajput: शाहिद अन् मिरानं वरळीत घेतलं आलिशान घर; किंमत माहितीये?

Rafael Nadal French Open 2024 : लाल मातीचा बादशहा नदाल पहिल्या फेरीत बाहेर

Rahul Gandhi: सावरकरांची बदनामी प्रकरण; पुणे पोलिसांनी कोर्टाला असं काय सांगितले? ज्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT