google lens
google lens 
विज्ञान-तंत्र

गुगल लेन्सच्या मदतीने आपण गणिताचे प्रश्न सोडवू शकता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काही जणांना गणितांशी संबंधित प्रश्न सोडविण्यात अडचण असेल? तसे असल्यास, आता आपण गुगल लेन्सची मदत घेऊ शकता. गुगलने आपल्या गुगल लेन्सवर होमवर्क फिल्टर जोडले आहे. यामध्ये, विद्यार्थ्यांना फोनच्या कॅमेरा प्रश्नांवर फोकस करावे लागणार आहे. त्यानंतर त्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. ही सुविधा जगभरातील विद्यार्थ्यांना होमवर्क पूर्ण करण्यास मदत करेल. जे कोविड -19 साथीच्या आजारामुळे शाळेत जाऊ शकले नाहीत. गुगल लेन्स फीचर कसे वापरावे, गणितांशी संबंधित प्रश्न कसे सोडवता येतील ते जाणून घेऊयात. 

असा करा या फीचरचा वापर

१) जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर, सुरुवातीला होम बटणावर प्रेस करून गुगल असिस्टंट (Google Assistant) ओपन करा. येथे तुम्हाला गुगल लेन्सचा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा. येथे आपल्या फोनवर डायरेक्ट गुगल लेन्स देखील सर्च करू शकता. तुमच्याकडे पिक्सेल (Pixel) स्मार्टफोन किंवा अँड्रॉइड वन (Android One) फोन असेल तर गुगल लेन्स आपल्या कॅमेरा अ‍ॅपमध्ये असेल. आपण तिथून त्यात एक्सेस करू शकता किंवा आपण गुगल प्ले स्टोअर वरून लेटेस्ट वर्जन डाउनलोडही करू शकता.

२) गुगल लेन्समध्ये प्रवेश केल्यानंतर, आपल्याला कॅमेरा अ‍ॅपवर प्रवेश करण्याची परवानगी आवश्यक आहे.

३) जेव्हा कॅमेरा व्यूफाइंडर (camera viewfinder) उघडेल तेव्हा मेनूच्या बॉटमशी असलेल्या बारमधील होमवर्क (Homework)  फिल्टर निवडा.

४) आता गणिताच्या प्रश्नांकडे कॅमेरा दाखवा. गुगल लेन्स प्रश्नांना (हायलाइट्स) ओळखते, त्यानंतर आपण equation बटणावर टॅप कराल, लेन्स आपले प्रश्न सोडवेल.

गुगल लेन्स हा सहजपणे डिजिटल किंवा हातांनी पकडलेल्या वस्तू ओळखू शकतात. जर गणिताशी संबंधित प्रश्न सोपे असतील तर ते आपल्याला ते प्रश्न कसे सोडवायचे त्याचे स्टेप्स सांगत कसे सोडवायचे हे सुद्धा सांगतो. परंतु जर प्रश्न अवघड असेल तर तो आपल्याला इतर सेवांशी संबंधित वेब रिजल्ट्स  दाखवतो. अमेरिकेच्या यूजर्ससाठी सध्या गुगलने हे फीचर जाहीर केले आहे, लवकरच इतर देशांच्या वापरकर्त्यांसाठीही हे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT