YouTube Ads Blocker eSakal
विज्ञान-तंत्र

YouTube Account : यूट्यूब वापरताना एक चूक पडेल महागात; अकाउंट थेट होईल ब्लॉक!

यूट्यूबवर कित्येक वेळा अगदी 30 सेकंदांपर्यंतच्या जाहिराती असतात, ज्या स्किप देखील करता येत नाहीत.

Sudesh

यूट्यूबवर व्हिडिओ पाहताना मध्येच जाहिरात आल्यामुळे संपूर्ण मूडचा विचका होतो. असं होऊ नये यासाठी यूट्यूबने सबस्क्रिप्शन प्लॅन आणला आहे. मात्र, त्याऐवजी कित्येक जण अ‍ॅड ब्लॉकरचा उपयोग करतात. तुम्हीदेखील असे टूल्स वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

यूट्यूबवर कित्येक वेळा अगदी 30 सेकंदांपर्यंतच्या जाहिराती असतात. इतर जाहिरातींप्रमाणे या 5 सेकंदांमध्ये स्किप देखील करता येत नाहीत. यामुळेच कित्येक जण अ‍ॅड ब्लॉकरची मदत घेतात. यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ बघताना अगदी कमी अ‍ॅड्स दिसतात, किंवा एकही जाहिरात दिसत नाही.

यूट्यूब घेणार अ‍ॅक्शन

आता असे अ‍ॅड ब्लॉकर्स वापणाऱ्या व्यक्तींवर यूट्यूब कडक कारवाई करणार आहे. जाहिराती स्किप करण्यासाठी जर कोणी अ‍ॅड ब्लॉकर वापरताना आढळल्यास, त्या व्यक्तीचं अकाउंट बंद करण्यात येणार आहे. अर्थात, यूट्यूब त्यापूर्वी यूजर्सना वॉर्निंग देईल. (YouTube Ads Blocker)

एका रेडिट यूजरने या वॉर्निंगचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. यामध्ये यूट्यूबने दिलेला इशारा स्पष्टपणे दिसत आहे. अ‍ॅड ब्लॉकर वापरून यूजरने तीन व्हिडिओ सलग पाहिले, तर यूट्यूब त्यांना ब्लॉक करणार आहे. ही बंदी किती वेळापर्यंत असेल याबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

YouTube Warning

यूट्यूब प्रीमियम

यूट्यूबवर जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीमियम प्लॅन देण्यात आले आहेत. Youtube Premium सबस्क्रिप्शन हे 129 रुपये प्रति महिना या किंमतीला उपलब्ध आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर यूजर्स यूट्यूब म्युझिक देखील बॅकग्राउंडला प्ले करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT