YouTube Bug eSakal
विज्ञान-तंत्र

YouTube : यूट्यूबमध्ये आला विचित्र बग, अपलोड होतायत पॉर्न व्हिडिओ; डिलीटही करता येईना

Youtube Bug : एका पत्रकाराने हॅकर्सचा एक ग्रुप जॉईन करत हे प्रकरण समोर आणलं आहे.

Sudesh

यूट्यूबवर अडल्ट कंटेंट अपलोड करण्यावर बरेच निर्बंध आहेत. मात्र, एका बगमुळे यूजर्स यूट्यूबवर पॉर्न व्हिडिओ होस्ट करु शकत आहेत. विशेष म्हणजे हे व्हिडिओ डिलीटही होत नसल्याचं समोर आलं आहे.

404मीडिया न्यूज आउटलेटने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने हॅकर्सचा एक ग्रुप जॉईन करत हे प्रकरण समोर आणलं आहे. हे हॅकर्स यूट्यूबच्या अल्गोरिदमला बायपास करून या प्लॅटफॉर्मवर पॉर्न व्हिडिओ अपलोड करू शकत होते.

'यूट्यूब पॉर्न हंटर्स' नावाचा एक डिस्कॉर्ड ग्रुप आहे, जो पॉर्न वेबसाईटवरील व्हिडिओ थेट यूट्यूबवर शेअर करतो. या ग्रुपमधील हॅकर्स व्हिडिओ टॅगिंग सिस्टीमला गंडवून यूट्यूबवर हवे ते व्हिडिओ याठिकाणी अपलोड करू शकत असल्याचं समोर आलं आहे. एखादा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तो कशाबद्दल आहे हे व्हिडिओ टॅगिंग सिस्टीमध्ये दिलेल्या टॅगमुळे समजू शकतं.

या टॅग्समध्ये हे हॅकर्स 'newline' असं कॅरेक्टर वापरुन हॅकर्स यूट्यूबच्या अल्गोरिदमला चकवा देत आहेत. अशा प्रकारचे कोट्यवधी कॅरेक्टर्स या हॅकर्सनी यूट्यूबच्या व्हिडिओ टॅगमध्ये सोडले आहेत. यामुळे हे व्हिडिओ यूट्यूबच्या अल्गोरिदमला दिसतच नाहीत.

यूट्यूबच्या अल्गोरिदमला हे व्हिडिओ दिसत नसल्यामुळे त्यांना काढून टाकणं शक्य होत नाहीये. याबाबत नवीन उपाय शोधण्याबाबत यूट्यूब काम करत असल्याची माहिती कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT