YouTube Features eSakal
विज्ञान-तंत्र

YouTube Features : यूट्यूब पाहून अभ्यास करणं होणार सोपं; कंपनी आणतेय दोन नवीन फीचर्स!

YouTube Shorts : यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी देखील कंपनीने एक फीचर आणलं आहे.

Sudesh

गुगलचं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असणारं यूट्यूब हे जगप्रसिद्ध आहे. स्मार्टफोन वापरणारी जवळपास प्रत्येक व्यक्ती यूट्यूब वापरतेच. युट्यूबवर इन्फर्मेटिव्ह व्हिडिओ पाहून अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्याही कमी नाही. त्यामुळेच, यूट्यूब आता अशा यूजर्ससाठी नवीन फीचर्स लाँच करत आहे.

एज्युकेशनल व्हिडिओ

यूट्यूबवर एज्युकेशनल किंवा अकॅडमिक कंटेंटसााठी एक ऑटोमॅटिक फीचर देण्यात येणार आहे. यामुळे व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीमधील ठळक मुद्दे हे फोटो आणि टेक्स्ट स्निपेटच्या माध्यमातून यूजरला मिळेल. म्हणजेच, तुम्ही ज्या विषयाचा व्हिडिओ पाहत आहात, त्यातील प्रमुख मुद्दे तुम्हाला वेगळे दिसतील.

सध्या यूट्यूबचं हे फीचर बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसारख्या विषयांमध्ये उपयोगी ठरणार आहे. येत्या काळात इतर विषयांबाबत देखील असं फीचर लागू केलं जाऊ शकतं.

यूट्यूब शॉर्ट्स

शॉर्ट्स हा प्रकार यूट्यूबवर भरपूर प्रसिद्ध होतो आहे. यूजर्स कित्येक तास स्क्रोल करत हे व्हिडिओ पाहत राहतात. त्यामुळे, शॉर्ट्स व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी देखील कंपनी नवीन फीचर्स आणत आहे. सध्या यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओंमध्ये Q&A स्टिकर हे फीचर देण्यात येणार आहे.

क्वेश्चन अँड आन्सर या स्टिकरच्या माध्यमातून क्रिएटर्स आपल्या यूजर्सना एखादा प्रश्न विचारू शकतील. यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. कंपनीच्या वेबसाईटवर असणाऱ्या यूट्यूब टेस्ट फीचर्स अँड एक्सपेरिमेंट्स या पेजवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT